बाईक टॅक्सी चालकाच्या खात्यात ३३१ कोटी रुपये

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान एका बाईक टॅक्सी चालकाच्या बँक खात्यात तब्बल ३३१ कोटी रुपये जमा केल्याचे आढळले आहे. ही रक्कम केवळ ८ महिन्यांत जमा करण्यात आली होती. जेव्हा ईडीने त्या बाईक टॅक्सी चालकाच्या घरी छापा टाकला, तेव्हा समोर आलेले सत्य चकित करणारे होते. 'वनएक्सबेट' या अवैध सट्टेबाजी ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा ईडी तपास करत आहे. याच दरम्यान, ईडीचे अधिकारी एका बँक खात्यात ८ महिन्यांत जमा झालेल्या ३३१ कोटींहून अधिक रकमेच्या 'मनी ट्रेल'चा तपास करत असताना, ते एका बाईक टॅक्सी चालकाच्या घरी पोहोचले. हा बाईक टॅक्सी चालक दिल्लीच्या एका सामान्य परिसरात दोन खोल्यांच्या झोपडीत राहत होता.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाईक टॅक्सी चालकाच्या बँक खात्यात १९ ऑगस्ट २०२४ ते १६ एप्रिल २०२५ या दरम्यान ३३१.३६ कोटी रुपये जमा झाल्याचे दिसून आले. केवळ आठ महिन्यांच्या कमी कालावधीत कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार पाहून, केंद्रीय एजन्सीने बाईक टॅक्सी चालकाच्या बँक रेकॉर्डमध्ये दिलेल्या पत्त्यावर छापा मारला. तपासात आढळले की तो बाईक टॅक्सी चालक दिल्लीतील एका सामान्य भागात दोन खोल्यांच्या झोपडीत राहत होता आणि उदरनिर्वाहासाठी दिवसभर घराबाहेर राहून बाईक टॅक्सी चालवत होता.


उदयपूरच्या शाही लग्नावर १ कोटी खर्च


३३१ कोटींहून अधिक जमा रकमेपैकी १ कोटींहून अधिक रक्कम राजस्थानमधील लेक सिटी उदयपूर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये 'ग्रँड डेस्टिनेशन वेडिंग' वर खर्च करण्यात आल्याचेही ईडीच्या लक्षात आले. अधिकाऱ्यांनुसार, हे लग्न गुजरातच्या एका राजकीय नेत्याशी संबंधित आहे, ज्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. चौकशीदरम्यान बाईक टॅक्सी चालकाने ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याला बँक व्यवहारांबद्दल काहीही माहिती नव्हती, तसेच ज्यांचे लग्न त्याच्या खात्यातील निधीतून उदयपूरमध्ये झाले, त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना तो ओळखत नव्हता. बाईक टॅक्सी चालकाचे बँक खाते 'म्यूल प्लॅटफॉर्म' असल्याचे ईडीला संशय आहे. ईडीला आढळले की, खात्यात अनेक अज्ञात स्त्रोतांकडून मोठी रक्कम जमा झाली आणि ती त्वरीत इतर संशयास्पद खात्यांमध्ये पाठवली गेली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बँक खात्यात पाठवलेल्या निधीचा एक स्त्रोत अवैध सट्टेबाजीशी जोडलेला आहे. एजन्सी आता या खात्यातील व्यवहारांचे आणखी स्त्रोत आणि अंतिम ठिकाण तपासत आहे. 'म्यूल अकाउंट' चा वापर आर्थिक गुन्ह्यांतून कमावलेले पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी केला जातो आणि या खात्याचा मूळ मालक तो वापरणारा नसतो. अशी खाती बनावट किंवा भाड्याने घेतलेल्या केवायसी चा वापर करून तयार केली जातात, जिथे एखादी व्यक्ती कमिशनच्या बदल्यात आपले खाते वापरण्यास देते.

Comments
Add Comment

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा