ईशा केसकरच्या एक्झिटनंतर महिनाभरातच संपणार 'लक्ष्मीच्या पावलांनी'? नव्या मालिकेची घोषणा अन् वेळही तीच!

मुंबई : ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेमध्ये ईशा केसकरच्या अचानक एक्झिटनंतर कथा मोठ्या वळणावर आली होती. तिच्या ‘कला’ या पात्राचा अपघाती मृत्यू दाखवल्यानंतर मालिकेत नक्षत्रा मेढेकरची एन्ट्री झाली. मात्र कला-अद्वैत या जोडीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा मोठा धक्का ठरला आणि त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. आता या मालिकेच्या चाहत्यांवर आणखी एक धक्का येऊ शकतो, कारण अवघ्या काही दिवसांत नवीन मालिका सुरू होत असून तिला ‘लक्ष्मीच्या पावलांनी’चा टाइम स्लॉट देण्यात आला आहे.


सध्या ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होते. मात्र पुढील महिन्यापासून या वेळेत ‘वचन दिले तू मला’ ही नवी मालिका दाखवली जाणार आहे. १५ डिसेंबरपासून ही नवी मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी तिचा प्रोमो सुद्धा रिलीज झाला. त्यामुळे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ कायमस्वरूपी बंद होणार का किंवा मालिकेची वेळ बदलली जाणार का, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.


दरम्यान ‘वचन दिले तू मला’ या नव्या मालिकेत ‘ऊर्जा’ आणि ‘शौर्य’ यांची जोडी दिसणार आहे. अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत असून अभिनेते मिलिंद गवळी या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारतील. न्यायासाठी लढणाऱ्या ऊर्जाच्या संघर्षाची कोर्टरूम ड्रामा शैलीतील ही कथा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.


ईशा केसकरने मालिका का सोडली?


ईशाने मालिकेतून बाहेर पडण्याचे कारण तब्येतीचे असल्याचे स्पष्ट केले. सलग दोन वर्षे काम करत असताना तिच्या डोळ्याला फोड आला होता, तरीही ती शूटिंग करत होती. मात्र दुखापत वाढल्यानंतर डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. अन्यथा शस्त्रक्रिया करावी लागू शकते असे सांगण्यात आले. भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी ईशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्येच तिने टीमला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती.

Comments
Add Comment

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर