सुरज चव्हाणच्या लग्नात गोंधळ, “सगळ्यांची डोकी फिरली आहेत” म्हणत जान्हवी किल्लेकरने घेतली माईकची जबाबदारी

मुंबई : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याचा विवाहसोहळा पुरंदर तालुक्यातील खळद येथील माऊली गार्डन येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. २९ नोव्हेंबरला पार पडलेल्या या लग्नाची सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. हळद, मेहंदीपासून लग्नापर्यंतचे सर्व विधी चाहत्यांनी अक्षरशः उचलून धरले आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.


याच दरम्यान मंडपात झालेल्या गोंधळाचा एक व्हिडिओ विशेष चर्चेत आला आहे. बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकरने भर मंडपात माईक हातात घेत पाहुण्यांना शांत राहण्याची विनंती केली. अचानक वाढलेली गर्दी आणि तिच्या हालचालींमुळे सुरजला बाहेर यायला जमत नसल्याने तिने जमलेल्या गर्दीला एक विंनती केली. लग्नस्थळावर चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेमुळेही उत्सुकता वाढली आणि पाहुण्यांसह अनेक जण समारंभस्थळी दाखल झाले. सुरक्षेसाठी तब्बल ५० हून अधिक बॉडीगार्ड तैनात करण्यात आले होते, तरीही काही वेळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यासारखी दिसली.


या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जान्हवी किल्लेकरने माईक हातात घेत उपस्थितांना शांत राहण्याचं आवाहन केलं. “आपण सुरजच्या लग्नाला आलोय, आधी त्याचं लग्न तर होऊ द्या. तो आत बसलाय आणि वैतागलाय. कृपया थोडं सहकार्य करा. सगळ्यांचीच डोकी फिरली आहेत, आता सुरजला बाहेर येऊ द्या,” असे म्हणत तिने पाहुण्यांना संयम बाळगण्याची विनंती केली.


सुरजच्या लग्नसोहळ्यात जान्हवी करवलीची भूमिका बजावत होती. हळद, मेहंदी, लग्नापर्यंत जवळपास प्रत्येक विधीत ती दिसली. वरातीतही ती सुरजच्या गाडीत सोबत नाचत असलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. संपूर्ण समारंभात तिने सक्रिय भूमिका बजावल्यामुळे चाहत्यांकडून तिचं मोठं कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

'हि-मॅन'ला शेवटचे पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता; नवीन वर्षाची सुरुवातच होणार देशभक्तीने

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र बॉलिवूडचा हि-मॅन कायमच आपल्या

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची