कधी सुरू होणार भारत - दक्षिण आफ्रिका ODI ?

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. आता रविवार ३० नोव्हेंबर २०२५ पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन मॅचची वन डे सीरिज अर्थात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना झारखंडमधील रांचीत जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी नाणेफेक (टॉस) दुपारी एक वाजता होणार आहे.


भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांमध्ये ९४ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ९४ पैकी ५१ सामने जिंकले आहेत तर भारतीय संघाने ४० सामने जिंकले आहेत आणि तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाने घरच्या मैदानावर १८ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने २६ सामने जिंकले आहेत. परदेशात, भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने १४ सामने जिंकले आहेत. तटस्थ ठिकाणी झालेल्या सामन्यांपैकी १० सामने भारताने आणि ११ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. दोन्ही सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. या पराभवाचा बदला भारत एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकून घेणार का ? याचीच सध्या चर्चा आहे.


रांचीत सलामीची जोडी म्हणून भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हेच खेळण्याची शक्यता आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमाकांवर खेळण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांच्यापैकी एकजण चौथ्या क्रमांकावर तर पाचव्या क्रमांकावर केएल राहुल खेळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.


एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ


केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह और ध्रुव जुरेल


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका




  1. पहिला सामना - ३० नोव्हेंबर २०२५ - रांची, झारखंड

  2. दुसरा सामना - ०३ डिसेंबर २०२५ - रायपूर, छत्तीसगड

  3. तिसरा सामना - ०६ डिसेंबर २०२५ - विशाखापट्टणम (वायझॅग), आंध्र प्रदेश


रोहित शर्माला षटकारांचा राजा अर्थात सिंक्सर किंग होण्याची सुवर्णसंधी




  1. रोहितला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम करण्यासाठी आणखी तीन षटकार मारावे लागणार. सध्या सर्वाधिक ३५१ षटकार मारण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे.

  2. रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीस हजार धावा करण्यासाठी आणखी ९८ धावांची आवश्यकता आहे. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९ हजार ९०२ धावा केल्या आहेत.

  3. रोहितला सलामीवीर म्हणून सोळा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी २१३ धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत त्याने सलामीवीर म्हणून १५ हजार ७८७ धावा केल्या आहेत.

  4. रोहितला भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रम करण्यासाठी आणखी एका शतकाची आवश्यकता आहे. त्याने भारतीय सलामीवीर म्हणून ३२ शतके केली आहेत.

  5. रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर होण्यासाठी आणखी ११५ धावा करण्याची आवश्यकता आहे.

  6. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत एक हजार ९७३ धावा केल्या आहेत. त्याला या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे.

  7. रोहितला भारतात सलामीवीर म्हणून पाच हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी १३३ धावांची आवश्यकता आहे. त्याने आतापर्यंत भारतात सलामीवीर म्हणून चार हजार ८६७ धावा केल्या आहेत.

  8. रोहितने त्याच्या कारकीर्दीत बहुतांश धावा या विजयात केल्या आहेत. रोहितला भारताच्या विजयात बारा हजार धावा पूर्ण करण्यासाठी आणखी ३० धावा आणि अर्थातच विजयाची आवश्यकता आहे. ही कामगिरी केल्यास तो आशियातील सर्वोत्तम सलामीवीर होणार आहे.

  9. रोहितला सेना देशात (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) पाच हजार एकदिवसीय धावा करण्यासाठी ३६ धावांची आवश्यकता आहे.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक