एआयचा वाढता प्रभाव: जखमेचा बनावट फोटो वापरून कर्मचाऱ्याने घेतली सुट्टी, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

नवी दिल्ली : आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) इतकी प्रगत झाली आहे की वास्तव आणि बनावट यातील सीमारेषा धुसर होत चालली आहे. डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने फोटो आणि व्हिडिओ अशा प्रकारे बदलले जाऊ शकतात की अनुभवी लोकसुद्धा त्यातील फसवणूक ओळखण्यात अपयशी ठरतात. याचा गैरवापर केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित नसून, आता दैनंदिन कामकाजातही दिसू लागला आहे.


काही दिवसांपूर्वी स्विगी रिफंडसाठी एका वापरकर्त्याने एआयच्या मदतीने तुटलेली अंडी जास्त असल्याचे खोटे चित्र तयार केले होते. आता एक नवा किस्सा समोर आला आहे. यावेळी गोष्ट अन्नपदार्थांची नसून, ‘ऑफिस लीव्ह’ची आहे.


कर्मचाऱ्याने एआयने बनवली ‘नकली जखम’, एचआरने लगेच दिली रजा


ट्विटर वर शेअर झालेल्या पोस्टनुसार, एका कर्मचाऱ्याने त्याच्या हाताचा साधा, जखम नसलेला फोटो काढला. त्यानंतर एआय टूल, जसे जेमिनी नॅनो मध्ये फक्त एक साधे निर्देश लिहिले: “हातावर जखमेचा कट लावा.”


काही क्षणात एआयने अतिशय वास्तववादी जखम असलेला फोटो तयार केला. ती जखम पाहून बनावट आहे हे ओळखणे जवळपास अशक्य होते, रक्ताचा रंग, सुज, कटची खोली सर्व काही खरं वाटत होते.


हा फोटो कर्मचाऱ्याने थेट एचआर विभागाला पाठवला आणि सांगितले की तो अपघातात जखमी झाला आहे त्यामुळे रजा आवश्यक आहे. आश्चर्य म्हणजे, एचआरने कोणतीही तपासणी, अतिरिक्त पुरावे किंवा डॉक्टरांचे प्रमाणपत्र न मागता रजा मंजूर केली.


या प्रकरणावर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी चिंता व्यक्त केली की एआयमुळे बनावट आणि वास्तव यातील फरक करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. काही एआय-निर्मित प्रतिमा सहज ओळखता येतात, पण काही इतक्या अचूक असतात की अनुभवी लोक सुद्धा फसतात.


वापरकर्त्यांनी असेही नमूद केले की आजकाल केवळ फोटोवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरत आहे. खरा प्रश्न असा की, आगामी काळात आपण बनावट आणि वास्तविक प्रतिमा यामधील फरक कसा ओळखणार?


सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, भविष्यात डीपफेक शोधण्यासाठी आणि प्रतिमा पडताळण्यासाठी अत्याधुनिक साधने आवश्यक ठरणार आहेत. अन्यथा, अशा प्रकारचे गैरवापर सतत वाढू शकतात.

Comments
Add Comment

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर