धक्कादायक! पुण्यात 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या तरुणाचे टोकाचे पाऊल, अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

पुणे: 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर पवार असे या २६ वर्षीय तरुणाचे नाव आहे. हा मुळचा बुलढाण्याचा रहिवासी असून पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी तो आला होता. सागरने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही आहे. मात्र परिक्षेच्या ताणामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी नोंद करून घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,सागर पवार स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी बुलढाण्याहून पुण्यात आला होता. पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो राहत होता. शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) पहाटे पोलिसांना या घटनेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सागर पुण्यात ज्या ठिकाणी राहत होता तो रूम आतून लॉक असल्यामुळे पोलीस दरवाजा तोडून आत शिरले. यावेळी सागर पवार मृत अवस्थेत दिसून आला.




यानंतर पोलिसांनी घटनास्थळी काही पुरावा मिळतो का हे पाहण्यासाठी संपूर्ण रुमचा तपास केला. मात्र पोलिसांच्या हाती काहीच पुरावा लागला नाही. कोणतीच चिठ्ठी किंवा निशाणी सोडून गेल्याचा कोणताच पुरावा सागरने मागे सोडला नाही आहे. यामुळे तपास करताना पोलिसांना प्राथमिक अंदाजे वर्तवणे सुद्धा कठीण जात आहे. दरम्यान या घटनेत आता सागर पवारचे कुटुंबियांसोबतचे संभाषण आणि मोबाईलची तपासणी यावरून तपास करण्यात मदत होणार आहे. यामुळे कदाचित त्याच्या आत्महत्या मागचे कारण समजणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि