Operation Sagar Bandhu : 'दितवाह'चा विध्वंस! श्रीलंकेत १२३ बळी; मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन सागर बंधू' तातडीने सुरू

श्रीलंकेत आलेल्या 'दितवाह' (Ditwah) चक्रीवादळामुळे (Cyclone) मुसळधार पाऊस आणि पुराने मोठे थैमान घातले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी श्रीलंकेच्या उत्तर आणि मध्य भागात या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. आपत्ती व्यवस्थापन केंद्राने (डीएमसी) दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १२३ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १३० जण अजूनही बेपत्ता आहेत. या चक्रीवादळामुळे आणि भूस्खलनामुळे श्रीलंकेच्या अनेक भागांतील लाखो लोक प्रभावित झाले आहेत. अंदाजे ४४,००० लोक मुसळधार पावसामुळे प्रभावित झाले असून, ४३,९९५ घरं उद्ध्वस्त झालेल्या लोकांना सरकारी कल्याण केंद्रांमध्ये हलवण्यात आलं आहे. अनेक लोकांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. श्रीलंकेच्या सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सशस्त्र दलांच्या मदतीने मदत कार्य सुरू केले आहे. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर आणि बोटींचा वापर केला जात आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.



श्रीलंकेत भीषण पूर; ५६ बळी, ६० बेपत्ता


श्रीलंकेत 'दितवाह' चक्रीवादळामुळे आलेल्या भीषण पुरामुळे (Devastating Floods) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, सार्वजनिक सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला असून, ६० लोक अजूनही बेपत्ता आहेत, तर सुमारे ६०० घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे, ज्यामुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या लष्कर आणि पोलीस दलांनी मदत आणि बचाव कार्य आणखी तीव्र केले आहे. या मुसळधार पावसामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामकाज देखील विस्कळीत झाले. खराब हवामानामुळे जवळपास १५ उड्डाणे (Flights) श्रीलंकेतून शेजारील भारतीय विमानतळांवर (त्रिवेंद्रम आणि कोचीन) वळवण्यात (Diverted) आली आहेत. मदत आणि बचाव कार्याच्या माध्यमातून, कोलंबोपासून सुमारे २२० किलोमीटर ईशान्येकडील पोलोन्नरुवा येथील एका पुलावर अडकलेल्या तेरा जणांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे.



भारताने श्रीलंकेला पाठवले १२ टन मदत साहित्य


भारत सरकारने आपल्या 'नेबरहूड फर्स्ट' (Neighbourhood First) धोरणांतर्गत 'ऑपरेशन सागर बंधू' (Operation Sagar Bandhu) हा महत्त्वाकांक्षी मदत उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, भारतीय हवाई दलाचे (IAF) एक विशेष विमान सुमारे १२ टन मदत साहित्य घेऊन श्रीलंकेत दाखल झाले आहे. या साहित्यात ताडपत्री, ब्लँकेट, स्वच्छता किट, अन्नपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे, ज्यामुळे पूरग्रस्तांना मोठा आधार मिळणार आहे. हवाई दलासोबतच भारतीय नौदलानेही (Indian Navy) मदतीचा हात पुढे केला आहे. नौदलाच्या आयएनएस विक्रांत आणि आयएनएस उदयगिरी या जहाजांमार्फत श्रीलंकेला सुमारे ४.५ टन रेशन आणि २ टन रेशन (एकूण ६.५ टन) पोहोचवण्यात आले आहे. श्रीलंकेतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, भारत सरकारने गरज पडल्यास आणखी मदत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. या कृतीमुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ झाले आहेत.

Comments
Add Comment

Attack on Iran's Lavan Island oil refinery : युद्धविरामानंतर काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

तेहरान : युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

Iran US War Ceasefire : १० कलमी अटी अन् बरंच काही...; 'इराणला उद्ध्वस्त करू' म्हणणारे ट्रम्प अचानक मवाळ का झाले ? नेमकी कोणाची खेळी ?

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये (Iran US War Ceasefire) अखेर दोन

Iran US War Ceasefire : मोठी बातमी : अखेर युद्धाला 'पूर्णविराम'! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवडे शांततेचा करार

 डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा वॉशिंग्टन : गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये धुमसणारा संघर्ष अखेर

Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप

Donald Trump : आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल...;डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा

वॉशिंग्टन : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

America: अमेरिका एफ-१५ पायलटला किती पगार देते? ही रक्कम ऐकून तुम्हाला बसेल धक्का

मुंबई: अमेरिकेने इराणमध्ये अडकलेल्या आपल्या एफ-१५ पायलट्सला वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली. ही मोहीम यशस्वी