Accident : अपघाताने कुटुंब उद्ध्वस्त! भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; ४ वर्षांच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील ७ जणांचा करुण अंत

काल, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी घडलेल्या एका अत्यंत भयावह अपघातात (Tragic Accident) एकाच कुटुंबातील चार वर्षांच्या मुलासह सात जणांचा करुण अंत झाला आहे. भरधाव वेगाने खडी वाहून नेणाऱ्या डंपरचा ताबा सुटल्याने तो थेट समोरून येणाऱ्या एका कारवर कोसळला. अपघात इतका भीषण होता की, डंपरमध्ये भरलेली खडी (Gravel) थेट कारवर पडल्याने संपूर्ण कार दोन फुटांपर्यंत चक्काचूर झाली. सुमारे ५ फूट लांबीची ही कार डंपर आणि खडीखाली पूर्णपणे चिरडली गेली होती, ज्यामुळे बचाव कार्यासाठी आलेल्या पथकाचे हृदय हेलावले. अपघातग्रस्त डंपर बाजूला करण्यासाठी तीन मोठ्या क्रेनची मदत घ्यावी लागली आणि खडी काढण्यासाठीही अनेक तास लागले. अपघातग्रस्त कुटुंब आपल्या काकांच्या अंत्यसंस्काराला जात होते, मात्र रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या कारमध्ये महेंद्र यांची पत्नी राणी (५०), मुलगा संदीप (२४), मोठी बहीण जूली (२४), जूलीचा मुलगा अनिरुद्ध (४), जावई शेखर (२८), मेहुणीचा मुलगा विपिन (२०) आणि मेहुणा उमेश सैनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांविषयी आणि भरधाव वेगाच्या धोक्यांविषयी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.



डेहराडूनहून येणारा भरधाव डंपर कारवर उलटला


सहारनपूरमधील सय्यद माजरा गावातील हे कुटुंब गंगोह येथे एका आप्ताच्या अंत्यसंस्कारासाठी कारमधून निघाले होते. त्यांची कार गावाबाहेर दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवेवर पोहोचताच हा अपघात घडला. डेहराडूनहून येणाऱ्या भरधाव डंपरचा ताबा सुटला आणि तो थेट या कारवर उलटला. डंपरचे वजन आणि खडीमुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पोलीस अधीक्षक (शहर) व्योम बिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधून एकाच कुटुंबातील सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या भीषण अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके तैनात केली आहेत. याप्रकरणी गगलहेडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.



कारचा पूर्णपणे चक्काचूर


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार अचानक डंपरच्या समोर आली. डंपर चालकाने ब्रेक लावले, परंतु वेग खूप जास्त असल्याने त्याचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेला हा डंपर थेट कारवर उलटला. अपघात इतका भीषण होता की, कार पूर्णपणे चिरडली गेली आणि कुटुंबातील सदस्य कारमध्येच अडकले.
या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अपघातात मृत पावलेल्यांपैकी संदीप आणि त्यांची आई राणी यांच्यावर शुक्रवारी सय्यद माजरा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, मुलगी जूली, जावई शेखर आणि त्यांचा मुलगा अनिरुद्ध यांच्यावर हरिद्वारमधील चांगा मछली भगवानपूर येथे अंत्यसंस्कार झाले. महेंद्र यांचे मेहुणे उमेश सैनी यांच्यावर हरिद्वारमधील रावली येथे आणि मेहुण्यांचा मुलगा विपिन यांच्यावर दौलतपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातामुळे अनेक कुटुंबांवर मोठे दुःख कोसळले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



एका तासानंतर मृतदेह बाहेर


अपघाताचे प्रत्यक्षदर्शी असलेले गावचे सरपंच यांनी सांगितले की, "डंपरमध्ये खडीचा अतिरिक्त भार भरलेला होता आणि तो १०० किमी/तासपेक्षा जास्त वेगाने जात होता." चालकाने वेगाने वळण घेण्याचा प्रयत्न करताच त्याचे नियंत्रण सुटले आणि तो कारवर उलटला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, डंपर आणि खडीखाली चिरडलेली कार बाजूला करण्यासाठी अनेक क्रेनची मदत घ्यावी लागली. एक तासानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी, मृतांपैकी संदीप याला जेव्हा बाहेर काढले, तेव्हा तो श्वास घेत होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू