'आय पॉपस्टार'च्या पहिल्यावहील्या ट्रॉफीवर महाराष्ट्राचे नाव! मराठमोळ्या रोहीत राऊतचा प्रथम क्रमांक, पत्नी जुईलीने केले कौतुक

मुंबई: अॅमेझोन एमएक्स प्लेअरवरील 'आय पॉपस्टार' या म्युझिक रिअॅलिटी शोने सहा आठवड्यांचा अविस्मरणीय प्रवास पूर्ण करत पहिला सीझनचा विजेता घोषित केला. मराठी संगीतक्षेत्रातील प्रसिद्ध गायक रोहीत राऊतने या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचे विजेते पद नावावर करत मराठी संगीत क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. या कार्यक्रमामुळे रोहीतची ओळख आता पॉपस्टार म्हणून झाली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नवीन गाणी सादर करत रोहीतने त्याच्या संगीतातील कौशल्याची नव्याने ओळख करून दिली आहे.


विजयी झाल्यानंतर रोहित राऊतने खूप भावूक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "मी 'आय पॉपस्टार' मध्ये एक कलाकार म्हणून माझा मार्ग शोधायला आलो होतो आणि आज विजेता म्हणून उभा आहे. यामुळे माझ्या कलेवर माझा आत्मविश्वास वाढवला आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या चाहत्यांचे मी आभार मानतो." या कार्यक्रमात विजयी झाल्यामुळे त्याला बक्षीस म्हणून सात लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली. तर उपविजयी ऋषभ पांचाळला ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.



रोहीतच्या यशावर पत्नीची कौतुकाची थाप


रोहीतची पत्नी जुईली जोगळेकरने रोहीतच्या यशासाठी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर खास पोस्ट केली आहे. ज्यात तिने कौतुकाने लिहले आहे, "आज मला तुझा किती अभिमान वाटतोय हे मी शब्दातही सांगू शकत नाही. आय-पॉपस्टारचा तुझा संपूर्ण प्रवास मी पाहिला आहे. तुझी निष्ठा, रात्र-रात्र जागणं... तू तुझ्यातील कौशल्यांना वाव दिलास, ती प्रत्येक गोष्ट दिसून येत आहे आणि त्याचा खरोखरच फायदा झाला. मला अजूनही आठवतंय अंतिम टप्प्यासाठी शेवटच्या आठवड्यात तुझी बरीच गाणी नाकारली गेली होती. पण आज तुझा तो शेवटचा परफॉर्मन्स... खूपच कमाल! तू फक्त सादरीकरण केले नाहीस, तर त्या स्टेजवर तुझा ताबा होता. हा विजय खूप योग्य आहे आणि कायम आठवणीत राहणारा आहे. मी तुझा संघर्ष पाहिला आहे, तुझे कठोर परिश्रम पाहिले आहेत आणि आज तुझं यशही पाहते आहे. तुझा खूप अभिमान आहे. असाच पुढे जात राहा ही तर फक्त सुरुवात आहे."





१८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या शोमध्ये किंग, आस्था गिल, आदित्य रिखारी आणि परमिश वर्मा हे गायक परिक्षकाच्या खुर्चीत बसलेले पाहायला मिळाले. विविध भाषांमध्ये गाणारे स्पर्धक या मंचावर सुंदर पद्धतीने गाणी सादर करताना दिसले. या कार्यक्रमातून मराठमोळा गायक रोहित राऊतने पुन्हा एकदा रिअॅलिटी शो गाजवला आणि ट्रॉफी आपल्या नावावर केली. त्यामुळे रोहीत राऊतच्या विजयामुळे I-POPSTAR च्या पहिल्याच सीझनवर महाराष्ट्राचे नाव कोरले गेले.


आय पॉपस्टारमध्ये सादर झालेले ८५ हून अधिक ओरिजनल ट्रॅक आणि देशभरातून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे या कार्यक्रमाने भारतीय पॉप म्युझिकच्या जगात एक नवा ट्रेंड तयार केला आहे. पहिल्याच सीझनमध्ये अनेक कलाकारांनी रातोरात स्टारडम मिळवले. ज्यात विशेष करून महाराष्ट्राबद्दल सांगायचे तर मराठमोळ्या रोहीतप्रमाणे राधिका भिडेने सुद्धा चाहत्यांचे मन शेवटपर्यंत जिंकले. या कार्यक्रमात सहभागी सर्व पॉपस्टारची गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Comments
Add Comment

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल