विवाहादरम्यान सहा लाखांचे दागिने चोरीला

पुणे (प्रतिनिधी) : बाणेर येथील मंगल कार्यालयात विवाहादरम्यान चोरट्यांनी दागिन्यांची पिशवी चोरून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे सहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलीचा विवाह समारंभ २५ नोव्हेंबर रोजी बाणेर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यांनी एका टेबलवर गडबडीत दागिन्यांची पिशवी ठेवली. पिशवीत सोन्याचे दागिने, एक लाख ३० हजारांची रोकड, मोबाइल संच असा ऐवज होता. चोरट्यांनी संधी साधून पिशवी चोरली. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करत आहेत. दरम्यान, विवाह समारंभातून दागिने चोरीला जाण्याची ही तिसरी घटना आहे. पंधरा दिवसांपूर्वी लोणी काळभोर परिसरातही अशीच घटना घडली होती.
Comments
Add Comment

Mumbai News : एकाच दिवशी मुंबईत २७ हजार ८६६ महिलांच्या कर्करोगाची तपासणी

मुंबईत २९८ ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी राबवले महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर आशिया बूक रेकॉर्ड

Australian Cricket Star : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू अडचणीत ! ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात न्यायलयाची मोठी कारवाई

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा माजी सदस्य डेव्हिड वॉर्नर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. या वर्षाच्या

Dengue Vaccine : भारतात डेंग्यूविरोधातील पहिल्या लसीला मंजुरी; 'क्युडेन्गा' लशीबाबत जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

डेंग्यूच्या (Dengue) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय औषध

Mosquito Control Tips : पावसाळ्यात घराला डासांपासून कसं वाचवाल? आजारांचा धोका टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

पावसाळ्यात डासांचा त्रास वाढतो. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी

Nashik News : बनावट पावत्या अन् बिले...२७ बँकाना दीड काेटींचा गंडा, एक ताब्यात

Nashik News : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहर बँक असोसिएशन (‘न्युबा’) अंतर्गत जिल्ह्यातील २७ बँकांच्या

Smart Fashion Hacks : महागडे कपडे न घेता स्टायलिश दिसायचंय? फॉलो करा 'या' स्मार्ट फॅशन हॅक्स

तुम्ही देखील स्टायलिश दिसण्यासाठी नेहमी महागडे कपडे खरेदी करता का? खरंतर नेहमीच महागडे खरेदी करण्याची गरज नसते.