नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

नगराध्यक्ष-नगरसेवक पदांसाठी ६२९ उमेदवार रिंगणात, उद्या संध्याकाळी ५ वाजता प्रचार संपणार


अडीच लाख मतदार ठरविणार उमेदवारांचे भवितव्य


अलिबाग : रायगड जिल्ह्यात २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानापासून मतमोजणीपर्यंत लागणाऱ्या सर्व कामकाजाचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक कर्मचारी या निवडणुकीच्या कामासाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


अलिबाग, खोपोली, श्रीवर्धन, मुरूड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान या नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ३४ आणि नगरसेवक पदासाठी ५९५ असे एकूण ६२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या नगरपरिषदांच्या हद्दीत १०७ प्रभाग आहेत. नगराध्यक्ष पदाच्या दहा आणि नगरसेवकपदाच्या २०९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. खोपोलीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सात व नगर सेवकपदासाठी ११८, अलिबागमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी ४२, श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चार आणि नगरसेवक पदासाठी ६०, मुरूडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तीन व नगरसेवक पदासाठी ५८, रोहामध्ये व नगराध्यक्ष पदासाठी दोन नगरसेवक पदासाठी ५१, महाडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पाच व नगरसेवक पदासाठी ५३, पेणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तीन व नगरसेवक पदासाठी ७२, उरणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चार आणि नगरसेवक पदासाठी ४९, कर्जतमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन आणि नगरसेवक पदासाठी ४६, माथेरानमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक प्रचाराला आता अवघे दोनच दिवस बाकी आहेत. ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपणार आहे. आरोप-प्रत्यारोपांसह वेगवेगळे व्हिजन घेऊन ही निवडणूक लढविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मतदान २ डिसेंबरला होणार असून, ३०८ केंद्रांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार. २ लाख ३७ हजार ५०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासाकडून तयारी जोरात सुरु केली आहे. मतदान केंद्रांची पाहणी करण्यापासून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्ह्यातून सुमारे दोन हजार कर्मचारी मतदान व मतमोजणीच्या कामासाठी लागण्याची शक्यता आहे, तसेच या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये, म्हणून पोलीस यंत्रणेकडून देखील दक्षता घेण्यात आली आहे.


आघाडीतील शेकाप व काँग्रेसच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक आणि महायुतीमधील तनुजा पेरेकर असे दोघेजण निवडणूक रिंगणात आहेत. नगरसेवकपदाच्या २० जागांपैकी एका जागेवर महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसचे उमेदवार प्रशांत नाईक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता नगरसेवक पदाच्या १९ जागांसाठी ४२ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीचे मतदान १९ केंद्रांमध्ये होणार आहे. १६ हजार ३५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Comments
Add Comment

Virar Alibaug Corridor : विरार-अलिबाग कॉरिडॉर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीचे भूसंपादन तातडीने स्थगित करा- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : विरार-अलिबाग (Virar-Alibuag) बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची

NMIA : नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईतील कनेक्टिव्हिटी झाली मजबूत

नवी मुंबई विमानतळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर

Bharat Gogawale : १५ ऑगस्टला रायगडमध्ये मीच झेंडा फडकवणार!

- मंत्री भरत गोगावले; येत्या २४ तासांत पालकमंत्री म्हणून घोषणा होणार असल्याचा दावा मुंबई : महायुती सरकारमध्ये

Majha Dusrikade Hay Suru : 'माझं दुसरीकडं हाय सुरू' गाण्यावर रील करणारे ST महामंडळाचे कर्मचारी ३ दिवसांच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत, सेवेत येताच केला नवा Video

पनवेल : राज्य परिवहन विभागाच्या गणवेशात वैयक्तिक प्रसिद्धीसाठी रील / शॉर्ट व्हिडीओ करण्यास बंदी आहे. या बंदीचे