सॉफ्टवेअर अपग्रेडसाठी विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय! प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी परिस्थिती तपासावी, इंडीगोची सूचना

मुंबई: जगातील सर्वाधिक विक्री होणारी एअरबस ए३२० विमाने सॉफ्टवेअर अपग्रेडसाठी स्थगित करण्यात येणार आहेत. यामुळे भारतासह जगभरातील विमानप्रवासाला फटका बसणार आहे. एअरबसने तीव्र सौर किरणोत्सर्गामुळे ए३२० फॅमिली विमानांमधील फ्लाइट कंट्रोल सिस्टमद्वारे वापरला जाणारा डेटा करप्ट होण्याची भीती व्यक्त केल्यानंतर, इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांनी सॉफ्टवेअर अपग्रेडसाठी विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील २०० ते २५० विमानांना ताल्लेगळ सॉफ्टवेअर अपग्रेड किंवा हार्डवेअर री-अलाइनमेंटची आवश्यकता असल्यामुळे दुरुस्ती कामासाठी विमान कंपन्यांना विमानसेवा थांबवावी लागणार आहे. भारतात, इंडिगो आणि एअर इंडिया ग्रुपच्या ३५० हून अधिक ए३२० विमानांची उड्डाणे या अपग्रेडसाठी थांबवली जाणार आहेत. अपग्रेडसाठी दोन ते तीन दिवस लागणार असल्याने विमान सेवा सुरळीत होण्यासाठी पुढील आठवडा उजाडणार असल्याचा अंदाज आहे.



अमेरिकन विमान कंपनी जेटब्लूचे कॅनकुन ते न्यूआर्क हे ए३२० विमान ३० ऑक्टोबर २०२५ रोजी पायलटच्या सूचनांशिवाय अनपेक्षितपणे खाली उतरले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एअरबस विमानांचे सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या म्हणण्यानुसार, हे विमान अनियंत्रितपणे खाली उतरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ज्यामुळे काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.


इंडिगोने दिलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे की, "एअरबसने जागतिक ए३२० ताफ्यासाठी तांत्रिक सल्लागार जारी केला आहे. आम्ही आमच्या विमानांवरील अनिवार्य अपग्रेड पूर्ण काळजीने आणि सर्व सुरक्षा प्रोटोकॉलनुसार पूर्ण करत आहोत. आम्ही या सावधगिरीच्या अपग्रेडवर काम करत असताना, काही उड्डाणांच्या वेळापत्रकात काही किरकोळ बदल होऊ शकतात. आमचे पथक तुम्हाला पुन्हा तिकीट बुकिंग, अपडेट्स आणि माहितीसह मदत करण्यासाठी सदैव तयार आहे. विमानतळावर जाण्यापूर्वी कृपया आमच्या अॅप/वेबसाइटवर तुमची विमान स्थिती तपासा."




Comments
Add Comment

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच

Subansiri News : महागड्या विजेचा फटका: आसाम आणि मेघालयचा सुबनसिरी प्रकल्पातील अतिरिक्त वीज घेण्यास नकार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी जलविद्युत योजना असलेल्या २००० मेगावॅट क्षमतेच्या 'लोअर सुबनसिरी' (Subansiri Lower HEP)

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने