ऑस्ट्रेलियन पीएम अल्बानीज यांनी ६२ व्या वर्षी बोहल्यावर , पत्नी १६ वर्षांनी लहान

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी नुकतेच त्यांची पार्टनर जोडी हेडन यांच्याशी लग्न केले. ६२ वर्षीय अल्बानीज यांनी आपल्या पदावर असताना ले लग्न केले असून असे करणारे ऑस्ट्रेलियाचे ते पहिले पंतप्रधान बनले आहेत. अल्बानीज यांनी ४६ वर्षीय जोडी हेडन यांच्याशी कॅनबेरा येथील पंतप्रधान कार्यालयात लग्न केले. जोडी आर्थिक सेवा क्षेत्रात काम करतात. अल्बानीज यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये हेडन यांच्याशी साखरपुडा केला होता.
पंतप्रधानांनी सोशल मीडियावर याबाबतची जी पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी एका शब्दात - 'विवाहित' असे लिहिले आहे.


ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांनी २०१९ मध्ये त्यांची पहिली पत्नी कार्मेल टेबट यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. हे लग्न १९ वर्षे टिकले. या नात्यातून त्यांना एक मुलगा, नाथन आहे. अल्बनीज आणि हेडन यांची भेट २०२० मध्ये मेलबर्नमध्ये एका बिझनेस डिनरमध्ये झाली होती. हेडनचेही हे दुसरे लग्न आहे. तथापि, हेडनच्या पहिल्या लग्नाची आणि घटस्फोटाची माहिती उपलब्ध नाही.


१२ वर्षांच्या वयात केले आंदोलन


ऑस्ट्रेलियाचे नवीन पंतप्रधान अँथनी यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात अवघ्या १२ वर्षांच्या वयातच केली होती. अँथनी आणि त्यांची आई सरकारी घरात भाड्याने राहत होते. स्थानिक परिषदेने सरकारी घरांचे भाडे वाढवले होते. लोक वाढीव भाडे भरण्यास तयार नव्हते, पण कोणीही पुढे येऊन त्याचा विरोध करण्यास तयार नव्हते. परिषद सर्व घरे विकण्याची योजना आखत होती. त्यावेळी परिषदेच्या निर्णयाविरोधात अँथनीने आंदोलन उभे केले होते. अखेरीस परिषदेला आपली योजना रद्द करावी लागली. २२ वर्षांच्या वयात ते लेबर पार्टीत सामील झाले होते. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा फेडरल खासदार (MP) म्हणून निवडून आले. २०१३ मध्ये लेबर पक्षाच्या पराभवानंतर अल्बानीज उपनेते आणि नंतर विरोधी पक्षनेते बनले. १० वर्षे विरोधी पक्षनेते राहिल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये निवडणूक जिंकली आणि स्कॉट मॉरिसन यांना हरवून पंतप्रधान झाले.

Comments
Add Comment

फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू

झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात

ट्रम्पच्या सतत बदलत्या धोरणामुळे आणि अव्यावहारिक अशा निर्णयांमुळे रखडला अमेरिका - भारत मुक्त व्यापार करार

वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सतत बदलत्या धोरणामुळे आणि अव्यावहारिक अशा निर्णयांमुळे

'ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला मिळालेले मोठे यश, पाकिस्तानने युद्धबंदीची केलेली विनंती', स्विस थिंक टँकचा खुलासा

बर्न : सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज (CHPM) या स्विस मिलिटरी थिंक टँकने ४७ पानांचा अहवाल

चीनसोबत करार केल्यास कॅनडावर १०० टक्के टॅरिफ लावणार: ट्रम्प

वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर

चीनची लोकसंख्या वर्षभरात ४० लाखांनी घटली; वृद्धांची संख्या वाढली

बँकॉक : कुटुंबनियोजनासारख्या योजना राबविल्याने आता चीनसमोर लोकसंख्येबाबत नवेच संकट उभे राहिले आहे. सरकारी

पाकिस्तानात लग्नमंडपात आत्मघाती हल्ला; ७ ठार

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एका लग्नसमारंभात भीषण आत्मघाती हल्ला झाला. या घटनेत ७