फक्त १७ वर्षांच्या इंटर कॉलेजच्या विद्यार्थ्याने बनवला रोबोट

लखनऊ : तंत्रज्ञानाच्या दुनियेत नेहमी मोठ्या कंपन्यांच्या आणि मोठ्या बजेटवाल्या स्टार्टअप्सच्या नवकल्पनांची चर्चा होते. पण, जिद्द, जिज्ञासा आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल तर वय मधे न येता अद्वितीय यश संपादन करता येते. याचं अगदी आत्ताचं उदाहरण म्हणजे फक्त १७ वर्षांच्या एका इंटर कॉलेजच्या विद्यार्थ्याने असा एक एआय रोबोट तयार केला आहे की, ते पाहून टेक एक्सपर्ट्सनाही आश्चर्य वाटले आहे. हा रोबोट फक्त प्रश्नांची उत्तरेच देत नाही, तर गरज पडल्यास शाळेत शिक्षकाची जागाही घेऊ शकतो.





उत्तर प्रदेशातील शिवचरण इंटर कॉलेजमध्ये १२वीत शिकणाऱ्या आदित्य कुमार या विद्यार्थ्याने 'सोफी' (Sophie) नावाचा एआय टीचर रोबोट बनवला आहे. हा रोबोट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि तो व्हिडिओमध्ये विविध विषयांवरील प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. एएनआयच्या माहितीनुसार, सोफी एलएलएम चिपसेटवर आधारित आहे, याच तंत्रज्ञानाचा वापर मोठे रोबोटिक्स उत्पादक करतात.


"मी एक एआय टीचर रोबोट आहे..." सोफीने दिली स्वतःची ओळख


एका डेमो व्हिडिओमध्ये जेव्हा या रोबोटला स्वतःबद्दल विचारले गेले, तेव्हा तिने हिंदीमध्ये उत्तर दिले, “मी एक एआय टीचर रोबोट आहे. माझे नाव सोफी आहे आणि माझी निर्मिती आदित्यने केली आहे. मी शिवचरण इंटर कॉलेज, बुलंदशहर येथे शिकवते. होय, मी मुलांना व्यवस्थित शिकवू शकते.” सोफीचा आवाज आणि भाषा पूर्णपणे हिंदीत आहे, ज्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना ती सहजपणे समजू शकते.


आदित्यने सांगितले की, "मी हा रोबोट बनवण्यासाठी एलएलएम चिपसेटचा वापर केला आहे. हीच चिप मोठ्या कंपन्या त्यांच्या रोबोट्समध्ये लावतात. सध्या सोफी फक्त बोलू शकते, पण आम्ही तिला लिहिण्यायोग्य बनवण्यावरही काम करत आहोत." आदित्यने अशी मागणी केली की, प्रत्येक जिल्ह्यात रिसर्च लॅब असावी, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या कल्पनांवर काम करू शकतील.


सोफीच्या क्षमता: वर्ग घेते आणि गणिताचे प्रश्नही सोडवते. व्हिडिओमध्ये आदित्यने रोबोटला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले —जगातील सर्वात उंच इमारत कोणती?भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?


वीज म्हणजे काय? १०० + ९२ चा प्रश्न. या प्रत्येक प्रश्नाचे सोफीने त्वरित आणि अचूक उत्तर दिले.


............


आदित्य म्हणतो, "जर एखाद्या दिवशी शिक्षक गैरहजर असतील, तर हा रोबोट मुलांना शिकवू शकतो. हा एक 'सब्सिट्यूट टीचर' म्हणून काम करेल." सध्या सोफी फक्त हिंदीत बोलते, पण आदित्य भविष्यात तिला बहुभाषिक (मल्टी-लँग्वेज सपोर्ट) बनवण्याची योजना आखत आहे.) या लहान जिल्ह्यातून आलेल्या या मोठ्या नवकल्पनेसाठी आदित्यने सरकारकडे प्रत्येक जिल्ह्यात संशोधन प्रयोगशाळा (Research Laboratory) उपलब्ध करून देण्याची मागणी केली, जेणेकरून भारतातील हजारो विद्यार्थी नवीन तंत्रज्ञान विकसित करू शकतील.

Comments
Add Comment

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या