कांदिवलीत गुरुवारी पाणीबाणी

येत्या गुरुवारी ४ डिसेंबरला पाण्याचा वापर करा जरा जपून


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जलवितरण सुधारणा कामांतर्गत आर दक्षिण विभागातील कांदिवली (पूर्व) परिसरात जलवाहिनी जोडणी तसेच जुनी जलवाहिनी खंडित करणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे गुरुवार, ४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजेपासून शुक्रवारी ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत, एकूण १८ तासांच्या कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित आहे. परिणामी, आर दक्षिण विभागातील ठाकूर गाव, समता नगर, चिखलवाडी व जानूपाडा परिसराचा पाणीपुरवठा गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी पूर्णपणे बंद राहणार आहे.


कांदिवली (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसमवेत ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणी करण्‍याचे कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच, कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुलद्वार परिसरातील ९०० मिलीमीटर व्यासाची जुनी जलवाहिनी खंडित करण्‍याची कार्यवाहीही नियोजित आहे. ही दोन्ही कामे गुरुवारी ४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजल्यापासून ते शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत, म्हणजे एकूण १८ तासांच्या कालावधीत हाती घेतली जाणार आहेत.


आर दक्षिण विभागातील ठाकूर गाव, समता नगर, चिखलवाडी, जानू पाडा परिसरास दररोज सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५ या कालावधीत पाणीपुरवठा केला जातो. नियोजित जलवाहिनी जोडणी तथा खंडित कामामुळे ठाकूर गाव, समता नगर, चिखलवाडी, जानू पाडा परिसराचा पाणीपुरवठा गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी पूर्णपणे बंद राहणार आहे. सर्व संबंधित नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी काटकसरीने वापरावे आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे.

Comments
Add Comment

Rajesh Aggarwal : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव, चार अधिकाऱ्यांची संधी हुकली

मुंबई : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सोमवार १ डिसेंबर २०२५ पासून पदभार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्रातील ७५ गावं स्मार्ट होणार; गावात सीसीटीव्ही, वाय-फाय, डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध होणार

मुंबई : महाराष्ट्रातील गावांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची गंगा पोहोचावी यासाठी राज्य सरकार अभिनव उपक्रम राबवत

एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत होणार

सूरत : एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत करता येईल. सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकर पूर्ण

प्रारुप मतदार यादीवरील हरकती, सुचनांची गांभीर्याने दखल घ्या

महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

दुबार नावाच्या मतदारांकडून निवडणूक कर्मचारी,अधिकाऱ्यांच्या कामांत अडथळा

नागरिकांना सहकार्य करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाच्या

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय, जन्मतारखेचा पुरावा म्हणून ‘आधार कार्ड’ ग्राह्य नाही

मुंबई : जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यावर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारने बंदी घातली आहे.