मुख्य बँक खात्यातून यूपीआय पेमेंट केल्याने डिजिटल फसवणुकीचा धोका वाढतो- पत्रात भारती एअरटेलच्या गोपाळ विठ्ठलांचा मोठा खुलासा

प्रतिनिधी: भारतात मोठ्या प्रमाणात डिजिटल फसवणूकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वाढत्या सायबर गुन्ह्यांचे केसेस पाहता भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी या सततच्या वाढत्या गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या घटना आटोक्यात येण्यासाठी एअरटेलकडून राबवल्या जाणा-या आवश्यक उपाययोजनांबद्दल माहिती देण्यासाठी ग्राहकांना उद्देशून त्यांनी पत्र लिहिले आहे.


यामध्ये म्हटले गेले आहे की,आजकाल बनावट पार्सल डिलीव्हरीचे कॉल, फिशिंग लिंक्स आणि डिजिटल अरेस्ट आदी घोटाळे मोठ्या प्रमाणात घडत असताना एअरटेल आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी एअरटेल पेमेंट्स बँकेच्या सेफ सेकं अकाउंटची घोषणा केली. हे खाते ग्राहकांच्या मुख्य बँक खात्यापासून स्वतंत्र ठेवले जाते. यामुळे डिजिटल पेमेंटसाठी वापरण्यात येणारा पैसा सुरक्षित राहतो आणि कोणत्याही संभाव्य फसवणूकीपासून अतिरिक्त संरक्षण मिळते.


'एअरटेल नेटवर्कमध्ये होणारे गुन्हे किंवा फसवणूकीच्या घटना आमच्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे. ग्राहकांची सुरक्षितता हेच आमचे कायमस्वरुपी प्राधान्य राहील' असे एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी पुढे सांगितले.आपल्या ग्राहकांच्या डिजीटल सुरक्षिततेसाठी एअरटेलकडून होत असलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.


ते म्हणाले आहेत की,' एअरटेल कंपनी अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ग्राहकांना स्पॅम कॉल आणि मेसेजबाबत कल्पना यावी याकरिता त्वरित अलर्ट देते. ग्राहकांनी चुकून एखादी लिंक क्लिक केली असेल तर ती लिंक ब्लॉक करण्याचीही सोय उपलब्ध करण्यात आली आहे.'


आपल्या निवेदनात्मक पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, 'परंतु आजच्या डिजिटल युगात आपले प्राथमिक बँक खाते किंवा इतर पेमेंट एप्लिकेशनशी जोडल्यास आपल्या बचतीला धोका निर्माण हो शकतो.' अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. हा धोका टाळण्यासाठी तसेच ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी सेफ सेकंड अकाऊंट हा सुरक्षित आणि सोप्पा उपाय आता उपलब्ध करुन दिल्याचे ते म्हणाले आहेत.


ग्राहकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात गोपाळ विठ्ठल यांनी सेफ सेकंड अकाउंटबद्दल तपशीलवार माहिती दिली.


पत्रातील माहिती -


सेफ सेकंड अकाउंट हे मुख्यतः दैनंदिन डिजीटल पेमेंटसाठी तयार करण्यात आले आहे.


या खात्यात कमी रक्कम ठेवण्याचीही मुभा आहे. या शिल्लक रकमेवर व्याजही दिले जाते.


एअरटेल पेमेंटंस बँकेतून कर्ज किंवा क्रेडिट सुविधा देत नसल्याने या खात्यात मोठी रक्कम ठेवण्याची गरज नसते


हे खाते एअरटेल थॅँक्स एप्लिकेशनच्या मदतीने सुरु करता येते. याकरिता एप्लिकेशनमधील पेमेंट बँक या ऑप्शनवर क्लिक करा, आधार आणि पॅन आधारित केव्हायसी पूर्ण करा. एमपीन सेट करा, खात्यात थोडी रक्कम जमा करा. या प्रक्रियेनंतर तुम्ही व्यवहार सुरक्षितपणे सुरु करु शकता.


ग्राहकांना आपल्या मुख्य बँकेतील खात्यातून पैसे हस्तांतरित करुन किंवा एअरटेल पेमेंट्स बँकेच्या कोणत्याही अधिकृत रिटेल पोइंटवर रोख रक्कम जमा करुन सेफ सेकंड अकाउंटमध्ये सहजपणे पैसे अदा करता येतात.


या सुविधेमुळे ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याविना त्यांचे आर्थिक व्यवहार अनधिकृत पेमेंट्स तसेच फसवणूकीपासून सुरक्षित ठेवतात.


डिजीटल सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी गोपाळ विठ्ठल यांनी ग्राहकांना सेफ अकाउंट सुरु करण्याचे आवाहन केले.


सेफ सेकंड अकाउंट सुरु करण्यासाठी काही मिनिटे लागतात. हे अकाउंट तातडीने सुरु करा.


आपले पैसे सुरक्षित ठेवा. एअरटेल आपल्या ग्राहकांना सुरक्षित, सर्वसमावेशक आणि वापरण्यास सोप्या अशा आर्थिक सेवा देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहील.’ अशा शब्दांत त्यांनी ग्राहकांना पत्राद्वारे आश्वासन दिले आहे.


संबंधित सुविधेकरिता नियम व अटी लागू राहतील. अधिक माहितीसाठी एअरटेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय, जन्मतारखेचा पुरावा म्हणून ‘आधार कार्ड’ ग्राह्य नाही

मुंबई : जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यावर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारने बंदी घातली आहे.

आताची सर्वात मोठी बातमी: गेल्या सहा तिमाहीतील जीडीपीत रेकॉर्डब्रेक वाढ! शेतीला मागे सारून 'या' क्षेत्राचे सर्वाधिक योगदान

मोहित सोमण: काही क्षणापूर्वी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) दुसऱ्या तिमाहीची जीडीपी व इतर

रशियाचे राष्ट्रपती पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्रपती पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते चार आणि पाच डिसेंबर २०२५ रोजी

मोठी बातमी: पडद्यामागे भारत व युएस व्यापारी करार होणार? वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांचे मोठे विधान

प्रतिनिधी: युएस व भारत यांच्यातील' ट्रेड डील' आता पूर्णत्वास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नवी दिल्लीतील

कुर्ला बस स्थानकावर १४ वर्षीय मुलाच्या लैंगिक छळप्रकरणी एकाला अटक

मुंबई : कुर्ला बस स्थानकावर अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आनंद बाळू जाधव याला विशेष पोक्सो

Stock Market Closing Bell आठवड्याची अखेर शेअर बाजारात घसरणीनेच सेन्सेक्स व निफ्टी सपाट सावधगिरीच का आणखी काय?

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात सपाट अथवा किरकोळ पातळीवर घसरण झाली आहे. शेअर