रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. दोन्ही सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. या धक्क्यातून सावरत भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. वेळापत्रकानुसार रविवार ३० नोव्हेंबर २०२५ पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना झारखंडमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता सुरू होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांमध्ये ९४ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ९४ पैकी ५१ सामने जिंकले आहेत तर भारतीय संघाने ४० सामने जिंकले आहेत आणि तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाने घरच्या मैदानावर १८ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने २६ सामने जिंकले आहेत. परदेशात, भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने १४ सामने जिंकले आहेत. तटस्थ ठिकाणी झालेल्या सामन्यांपैकी १० सामने भारताने आणि ११ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह और ध्रुव जुरेल
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका
पहिला सामना - ३० नोव्हेंबर २०२५ - रांची, झारखंड
दुसरा सामना - ०३ डिसेंबर २०२५ - रायपूर, छत्तीसगड
तिसरा सामना - ०६ डिसेंबर २०२५ - विशाखापट्टणम (वायझॅग), आंध्र प्रदेश