दक्षिण आफ्रिकेने केलेल्या पराभवाचा बदला भारत एकदिवसीय मालिकेत घेणार ?

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रविवार ३० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी झारखंडमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये दुपारी १:३० वाजता सुरू होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. दोन्ही सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. या पराभवाचा बदला भारत एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकून घेणार का ? याचीच सध्या चर्चा आहे.


सलामीची जोडी म्हणून भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हेच खेळण्याची शक्यता आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमाकांवर खेळण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांच्यापैकी एकजण चौथ्या क्रमांकावर तर पाचव्या क्रमांकावर केएल राहुल खेळण्याची शक्यता आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.


वेळापत्रकानुसार रविवार ३० नोव्हेंबर २०२५ पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना झारखंडमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता सुरू होईल.


भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांमध्ये ९४ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ९४ पैकी ५१ सामने जिंकले आहेत तर भारतीय संघाने ४० सामने जिंकले आहेत आणि तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाने घरच्या मैदानावर १८ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने २६ सामने जिंकले आहेत. परदेशात, भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने १४ सामने जिंकले आहेत. तटस्थ ठिकाणी झालेल्या सामन्यांपैकी १० सामने भारताने आणि ११ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.


एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ


केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह और ध्रुव जुरेल


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका




  1. पहिला सामना - ३० नोव्हेंबर २०२५ - रांची, झारखंड

  2. दुसरा सामना - ०३ डिसेंबर २०२५ - रायपूर, छत्तीसगड

  3. तिसरा सामना - ०६ डिसेंबर २०२५ - विशाखापट्टणम (वायझॅग), आंध्र प्रदेश

Comments
Add Comment

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रविवारपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका, कोण मारणार बाजी ?

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. दोन्ही

महिला प्रिमीअर लीग २०२६ च्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : महिला प्रीमिअर लीग २०२६ हंगामाच्या तयारीला वेग आला असून गुरूवारी नवी दिल्लीत मेगा ऑक्शन पार पडत आहे.

भारताच्या १६ वर्षीय तन्वी शर्माने माजी विश्वविजेत्या ओकुहाराला हरवले

लखनऊ : भारताच्या १६ वर्षीय तन्वी शर्माने माजी विश्वविजेत्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून सय्यद मोदी

डेफलिंपिक २०२५ मध्ये भारताने जिंकली २० पदके

डेफलिंपिक २०२५ मध्ये भारताने नऊ सुवर्ण पदकांवर कोरले नाव टोकियो : जपानमधील टोकियो येथे १५ ते २६ नोव्हेंबर या

BCCI On Gautam Gambhir Resignation Ind vs SA: गौतम गंभीर यांचा राजीनामा चर्चेत; BCCI चा निर्णय स्पष्ट, महत्वाची माहिती समोर

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला २-० ने पराभव स्विकारावा लागल्यानंतर टीम इंडियाच्या

रोहित शर्मा पुन्हा अव्वल स्थानावर

दुबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (२६ नोव्हेंबर) पुरुषांची फलंदाजी क्रमवारी जाहीर केली आहे. या