ते माझ्यासाठी सर्वकाही होते… - हेमा मालिनीची भावुक पोस्ट

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या ८९व्या वर्षी झालेल्या निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकात बुडाली. अनेक दशकं चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या सुपरस्टारच्या शेवटच्या क्षणांत त्यांच्या सोबत मुलं आणि पत्नी हेमा मालिनी खंबीरपणे उभे होते. त्यांचं कुटुंब अजूनही या दुःखातून सावरू शकलेलं नाही. अशातच, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी हेमा मालिनी यांनी अखेर आपल्या भावना व्यक्त केल्या. आयुष्यभर साथ देणाऱ्या जोडीदाराच्या आठवणी सांगताना त्यांनी भावनिक शब्दांत आपलं दु:ख व्यक्त केलं आणि त्यांच्या सहवासाच्या क्षणांना उजाळा दिला. त्या म्हणतात -


धरमजी,
ते माझ्यासाठी खूप काही होते. प्रेमळ पती, ईशा आणि अहानाचे आदर्श वडील, मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक, कवी… आणि आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षणी ‘ज्याच्याकडे मी धाव घेई’ असे माझे सर्वस्व! ते नेहमीच माझ्या कुटुंबाशी आत्मीयतेने वागले, प्रेम आणि समभावाने प्रत्येकाला आपलंसं केलं.


कलाकार म्हणून त्यांचं अपार कसब, प्रचंड लोकप्रियतेनंतरही असलेली नम्रता आणि सार्वत्रिक आकर्षण यामुळे ते खऱ्या अर्थाने अद्वितीय आयकॉन होते. माझं वैयक्तिक दु:ख शब्दांत व्यक्तच होऊ शकत नाही…, त्यांच्याविना आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कायमच राहील.
आयुष्यभराच्या सहवासानंतर आता फक्त असंख्य आठवणी उरल्या आहेत….”

Comments
Add Comment

Dhurandhar And Marathi Movie Uttar.. 'धुरंधर'च्या वादळातही 'उत्तर' ची हवं हवा ; यापुढे मराठी चित्रपट मार खाणार नाही, दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

मुंबई : अक्षय खन्ना, रणवीर सिंग धुरंधर सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय, चोहीकडे धुरंधरची चर्चा होताना दिसतेय.

नृत्यांगना नोराचा अपघात! तरीही सनबर्नमध्ये केले नृत्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीचा काल (२० डिसेंबर) मुंबईत अपघात झाला. नोरा डेव्हिड गुएटा

बॉलीवूडचा जलवा हॉलिवूडमध्ये, धुरंधर गाण्यावर थिरकले जोनस ब्रदर्स

मुंबई : सध्या सर्वत्र धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची विक्रमी कमाई, रणवीर सिंग

मल्लिका शेरावतची व्हाईट हाऊस ख्रिसमस डिनरला हजेरी, सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : बॉलिवूडमधील ‘मर्डर’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय

६ फेब्रुवारीला लागणार 'लग्नाचा शॉट'!

लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि तयारी... …पण कधी कधी हाच आनंद गोंधळात बदलला तर? अशाच एका गोंधळावर आधारित ‘लग्नाचा शॉट’

निर्मिती सावंत - प्रार्थना बेहरे झळकणार सासू-सुनेच्या भूमिकेत

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओजचा बहुचर्चित मराठी चित्रपट 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' लवकरच