पिण्याचे पाणी येत नाही तरीही पाठवले बील

टिटवाळा इंदिरा नगर, स्मशानभूमी परिसरातील प्रकार


कल्याण  : टिटवाळा इंदिरा नगर, स्मशानभूमी रस्ता परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी येत नाही. तरीदेखील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका नियमित पाण्याचे बिल पाठवत आहे. हे पाण्याचे बिल तत्काळ रद्द करावे अशी मागणी संघर्ष रहिवासी संघटनेचे अध्यक्ष गणेश भाटे यांनी 'अ' प्रभागाचे सहाय्यक आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. इंदिरा नगर परिसरात मोठी लोकवस्ती असून गेली अनेक वर्षे येथे नागरिक राहतात. येथील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असून यापैकी मुख्य समस्या म्हणजे पिण्याच्या पाणी.


गेली कित्येक वर्षे जलवाहिनी नसतानादेखील कडोंमपाच्या वतीने पाण्याचे बिल पाठवले जात आहे. आता महापालिकेने याठिकाणी जलवाहिनी टाकली आहे. मात्र नळ जोडणीच दिली नाही. असे असतानादेखील पाणी बिल मात्र नियमितरीत्या येत आहे. याबाबत पालिकेला वारंवार सुचित करूनदेखील पालिका पाणी बिल पाठवत आहे. येथील नागरिकांना टिटवाळा स्टेशन येथून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. याबाबत संघर्ष रहिवासी संघटना इंदिरानगरचे अध्यक्ष गणेश भाटे यांचा पाठपुरावा सुरू असून सर्व पाणी बिल रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर संबंधित सहाय्यक आयुक्तांनी लवकरच सर्व्हे करू असे सांगितले आहे.

Comments
Add Comment

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या

दुर्दैवी! वाढदिवशी चिमुकली स्वत:लाच घेऊ लागली चावा,५ वर्षीय निशाचा करुण अंत

दिवा : दिवा येथे घराबाहेर खेळताना कुत्रा चावलेल्या पाच वर्षांच्या बालिकेची महिनाभर सुरु असलेली मृत्यूशी झुंज

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाय-फाय सुविधा

१० एमबीपीएसपर्यंत स्पीड; 'अदानी वन ॲप'द्वारे माहिती एका क्लिकवर नवी मुंबई : अदानी ग्रुपचा नवी मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नवी मुंबई अध्यक्षपदी भरत जाधव

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नवी मुंबई शहराध्यक्षपदी भरत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेचे दोन्ही बालेकिल्ले भाजपने कसे उद्ध्वस्त केले

रवींद्र चव्हाण, किसन कथोरे यांचे यशस्वी नेतृत्व ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या

मीरा-भाईंदर महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल

पदाधिकारी निर्धार मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच विश्वास भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या