खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् ; बार्शीत ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगावमध्ये गुरुवारी दुपारी ४ वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरसह विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गावात विहिरीत अडकलेली मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली.


याचदरम्यान जवळच खेळत असलेला शिवराज संदिप शेरखाने हा चार वर्षांचा मुलगा खेळता खेळता ट्रॅक्टरवर चढला. चुकून त्याच्या हातून गिअर सरकल्याने ट्रॅक्टरचा तोल गेला आणि क्षणार्धात तो थेट विहिरीत कोसळला. ही घटना इतकी अचानक घडली की आसपासच्या लोकांना प्रत्यक्षात काही समजायलाच वेळ मिळाला नाही. ट्रॅक्टर विहिरीत पडताच शिवराज बेचक्यात अडकल्याने त्याला वाचवणे अशक्य बनले.


अपघातानंतर शिवराजचे वडील संदिप शेरखाने यांनी मुलाला वाचवण्यासाठी तत्काळ धाव घेतली. गावातील युवकांनीही जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारत शोध मोहिम हाती घेतली. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.


अग्निशमन आणि पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचताच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र ट्रॅक्टर विहिरीच्या तळाशी अडकलेला, खोल पाणी आणि चिखल यामुळे शोधकार्य अत्यंत गुंतागुंतीचे झाले. ट्रॅक्टर बाहेर काढणे शक्य नसल्याने प्रथम विहिरीतील पाणी कमी करण्याचा निर्णय घेतला. सलग १२ तासांच्या प्रयत्नांनंतर विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात यश आले आणि पाणी उतरल्यावर शिवराजचा मृतदेह तळाशी दिसून आला. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. अवघ्या चार वर्षांच्या निरागस मुलाचा झालेला मृत्यू कुटुंबासाठी आणि गावासाठी मोठा धक्का आहे.

Comments
Add Comment

पुण्यात IT इंजिनिअरने वॅाशरुम मध्ये जाऊन घेतला गळफास.. सिक्युरिटी गार्ड आतलं दृश्य पाहून हादरला

कामाचा त्रास व आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे बहुतांश जणांच्या आत्महत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत

ॲशेस मालिका : सिडनीच्या मैदानात स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली

'द वॉल' द्रविडचा विक्रम मोडीत काढून ३७ वे कसोटी शतक पूर्ण सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये

ग्रीन सी प्रजातीच्या कासवाला दिले जीवदान

कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच आढळले हिरवे नर कासव श्रीवर्धन : श्रीवधर्नच्या कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच

७२ तासांत बदलले तीन पक्ष; मतदार राजाही संभ्रमात!

उल्हासनगर : उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक १५ मध्ये अवघ्या ७२ तासांत घडलेल्या एका प्रकाराने महापालिका

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास टोल-फ्री समुपदेशन!

मुंबई (प्रतिनिधी) : सीबीएसईने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मानसिक व सामाजिक समुपदेशन सेवा सुरू