गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान
सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार नुतनीकरण
मुंबई (विशेष प्रतिनिधी): गोरेगाव पहाडी गावमधील मोकळ्या जागेचा विकास करून त्याठिकाणी मनोरंजन मैदानाचा विकास केला जाणार आहे. याबरोबरच मालाड पश्चिम मधील आदर्श दुग्धालय मार्गावरील सरदार वल्लभभाई पटेल मनोरंजन मैदानाचेही नुतनीकरण केले जाणार आहे. या मोकळ्या जागेवर मैदानाचा विकास आणि मनोरंजन मैदानाचे नुतनीकरण आदींसाठी तबबल आठ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या 'पी/ दक्षिण विभागातील गोरेगांव पहाडी गांव न.भू.क्र. ५९६ (भाग) आणि ५९६ ई (भाग) हा मैदानासाठीचा आरक्षित भाग महापालिकेच्या ताब्यात असून या मोकळ्या जागेचा विकास केला जाणार आहे. यावर मैदानाचा विकास करताना त्याठिकाणी मुख्य प्रवेश द्वार सुरक्षा चौकी तसेच वीज मीटर खोली, मुख्य प्रवेश द्वाराजवळ सुशोभित भिंत, बांधणे, आवश्यक ठिकाणी पाय-यांची बांधणी, गजेबो, पदपथाचे बांधकाम, आकर्षक गोलाकार बैठक , लहान मुलांच्या खेळाच्या जागेमध्ये लाल माती , अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहीनीची दुरूस्ती , पदपथावर परगोला बांधणे तसेच विजेची आणि हिरवळीची, विद्युतीकरणाची व हिरवळीची कामे केली जाणार आहे.
हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या आगामी ...
तसेच पी/उत्तर विभागातील मालाड (प) येथील आदर्श दुग्धालय मार्गावरील न.भू.क्र. ६९अ/१अ या सरदार वल्लभभाई पटेल मनोरंजन मैदानाचे नुतनीकरणही करण्यात येणार आहे. या नुतनीकरणाच्या कामात प्राधान्याने मुख्य प्रवेशद्वार व सुरक्षा चौकी, गजेबोचे, अस्तित्वात असलेल्या संरक्षक भिंत, अस्तित्वात असलेल्या पदपथाची दुरूस्ती, अस्तित्वात असलेल्या कारंजे तोडून त्याजागी गजेबो चे बांधकाम, लहान मुलांच्या खेळाची साधने व टर्फ बसविणे तसेच विजेची आणि हिरवळीची कामे आदींचा समावेश आहे.
गोरेगाव आणि मालाडमधील मनोरंजन मैदानाच्या विकासासाठी हिरेन अँड कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी विविध करांसह ८ कोटी १८ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.