मोहित सोमण:जागतिक मजबूत फंडामेंटल आर्थिक संकेतामुळे आज शेअर बाजारात वाढ अपेक्षित होती त्याअनुषंगाने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सेन्सेक्स २८१.०५ व निफ्टी ८०.१५ अंकांने उसळला आहे. युएस बाजारातील टेक शेअर मोठ्या प्रमाणात रिबाऊंड झाल्याने बाजारात रॅली झाली सकाळी आशियाई बाजारासह गिफ्ट निफ्टीतही वाढ झाल्याने बाजारात आज तेजीचेच संकेत मिळत आहेत परंतु तरीही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आजही मोठी भूमिका बाजारात पार पाडतील. बँक निर्देशांकातही तेजी दिसत असल्याने बाजारात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत होणार आहे. मिड व स्मॉल कॅप मध्येही किरकोळ वाढ कायम राहिली आहे.
सकाळी निफ्टी व्यापक निर्देशांकात निफ्टी १०० (०.२५%), निफ्टी लार्जकॅप २५० (०.१८%), मिडकॅप १०० (०.१४%), मिडकॅप ५० (०.१३%) निर्देशांकात वाढ झाली असून क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ निफ्टी केमिकल्स (०.५१%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.५२%), मेटल (०.५५%), प्रायव्हेट बँक (०.३६%) निर्देशांकात वाढ झाली आहे. आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची शाश्वती आजही बाजारात तेजी कायम राखायला मदत करत आहेत. त्यातून चीनमध्ये औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात ५.५% घसरण झाली असली तरी नफ्यात १० महिन्यात पहिल्यांदाच वाढ झाली आहे जी तिमाही बेसिसवर ३.२% वाढ झाली.
सुरूवातीच्या कलात शेअर बाजारात सर्वाधिक वाढ डॉ अग्रवाल हेल्थकेअर (६.५६%), जीएमडीसी (६.२६%), तेजस नेटवर्क (५.६४%), अशोक लेलँड (४.३४%), जिलेट इंडिया (३.३३%), एथर एनर्जी (३.०८%), इमामी (३.०६%), गोदरेज अँग्रोवेट (३.०१%), सीपीसीएल (२.३०%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण वर्लपूल इंडिया (११.८८%), डीसीएम श्रीराम (२.८६%), ज्यूब्लिंएट अँग्रोवेट (२.४७%), सीसीएल प्रोडक्ट (२.२१%), जीई व्हर्नोवा (१.९७%), सिटी युनियन बँक (१.८४%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (१.५२%), पीव्हीआर आयनॉक्स (१.२९%) समभागात झाली आहे.