पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कल ‘जनरल मेडिसिन’ कडे

मुंबई (प्रतिनिधी): देशातील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी २०२५) यंदा विद्यार्थ्यांचा कल एमडी जनरल मेडिसिन या शाखेकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. टॉपर विद्यार्थ्यांपासून उच्च गुणधारकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर या शाखेची निवड करताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठा मिळवलेल्या रॅडिओलॉजीने यंदाही आपले स्थान कायम राखले असले तरी या वर्षी ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातुलनेत सर्जरीला प्राधान्य नसल्यामुळे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

टॉप १० पैकी ९ विद्यार्थ्यांनी तसेच शंभरमधील जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी जनरल मेडिसिनचा पर्याय निवडल्याने ही शाखा पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. व्यापक क्लिनिकल काम, सुरक्षित करिअर, पुढील सुपर-स्पेशॅलिटीचे पर्याय आणि रुग्णांशी थेट निगडित काम यामुळे या शाखेची लोकप्रियता वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे, गेल्या दशकभरात ‘हॉट फेव्हरेट’ मानली जाणारी एमडी रॅडिओडायग्नोसिस (रॅडिओलॉजी) ही यंदाही विद्यार्थ्यांची आवडती शाखा असली तरी स्थिर उत्पन्न आणि कमी शारीरिक ताण अशा कारणांमुळे तिची मागणी कायम असल्याचे दिसते. टेले-रॅडिओलॉजी आणि एआय-आधारित निदान तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात संधी वाढत असून त्याचा थेट परावर्तन विद्यार्थ्यांच्या पसंतीत दिसते.

निवड प्रक्रियेत देशातील सर्वोच्च गुणवत्ता दाखविणाऱ्या वैद्यकीय पदवीधरांनी आपली पसंती स्पष्ट केली आहे. करिअरची स्थिरता हे ऑपरेशन थिएटरपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरत आहे.प्रथम फेरीच्या मार्गदर्शनामध्ये मेडिसिन आणि रॅडिओलॉजी या शाखांवर उच्च गुणांच्या विद्यार्थ्यांचा मोठा भर दिसला तर शस्त्रक्रिया (सर्जरी) शाखेतील निवड लक्षणीयरीत्या घटली. आकडेवारीचा विचार करता पहिल्या १५०० उमेदवारांपैकी ६३२ (४२ टक्के) उमेदवारांनी जनरल मेडिसिन, तर ४४७ (३० टक्के) यांनी रॅडिओलॉजीची निवड केली. त्याच्या तुलनेत अवघे ६ टक्के विद्यार्थ्यांनीच एमएस जनरल सर्जरी स्वीकारली. हा कल उच्च-जोखमीच्या प्रक्रिया, दीर्घ प्रशिक्षण, ताणतणाव आणि वाढत्या वैद्यकीय वादप्रकरणांबद्दलच्या चिंतांमुळे दिसत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
Comments
Add Comment

मुंबईतले रस्ते धुळमुक्त करण्यासाठी 'ही' योजना राबवणार

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत

धुळ प्रदुषण वाढले, मुंबईतील ५३ बांधकामांना काम थांबवा नोटीस

मुंबई - मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

मल जल प्रक्रिया केंद्रांची कामे जलदगतीने

केंद्र उभारणीच्या कामाच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत एकूण ७ ठिकाणी मलजल

बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करणार

मुंबई : राज्यात बेकायदेशीर पद्धतीने तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट

मुंबईत आता मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकाला बंदी..

फुटपाथ आणि गच्चीवरही जाहिरात लावण्यास नसेल परवानगी मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत मागील अनेक महिन्यापासून

Maharashtra Winter Session 2025 : अखेर विधीमंडळ अधिवेशनाची तारीख १ डिसेंबरला ठरणार!

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकांमुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra