भारतात ॲपल कंपनीवर होणार दंडात्मक कारवाई

नवी दिल्ली : जगातील अग्रगण्य टेक कंपनी ॲपलला भारतात नवीन स्पर्धा कायद्यांमुळे मोठा दंड भरावा लागणा आहे. भारतीय नियमांमध्ये बदल केल्याने भारतीय स्पर्धा आयोगला (CCI) कंपनीच्या जागतिक उत्पन्नावर दंड ठोठावण्याचा अधिकार मिळाला आहे. यामुळे ॲपलला अंदाजे $३८ अब्ज (सुमारे ₹3,20,000 कोटी) इतका दंड होण्याचा धोका आहे. कंपनीला अद्याप दंड आकारला गेलेला नाही, परंतु नवीन नियमांमुळे काय होईल याचा अंदाज आल्यामुळे कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे.


हा वाद ॲपलच्या ॲप स्टोअर धोरणांपासून सुरू झाला. भारतीय डेव्हलपर्सने तक्रार केली की, आयफोन वापरकर्ते फक्त ॲपलच्या ॲप स्टोअरवरूनच ॲप्स डाउनलोड करू शकतात, तसेच पेमेंट सिस्टमवर ॲपलचे नियंत्रण असल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान होत आहे. डेव्हलपर्सनी याला बाजारातील असंतुलन मानले. यावरून CCI ने चौकशी सुरू केली आणि ॲपलच्या धोरणांचा तपास केला.


पूर्वी, भारतात फक्त देशांतर्गत व्यवसायावर दंड आकारण्याचा नियम होता. अॅपलच्या बाबतीत, फक्त भारतातील ॲप स्टोअर उत्पन्नावर दंड लागू शकत होता, जो तुलनेने कमी होता. परंतु २०२३ मध्ये झालेल्या सुधारणेनुसार, CCI ला कंपनीच्या जागतिक उलाढालीच्या १० टक्क्यांपर्यंत दंड ठोठावण्याचा अधिकार मिळाला. ॲपलच्या जागतिक महसुलाचा विचार करता, कंपनीला $३८ अब्ज इतका मोठा दंड होण्याची शक्यता आहे.


ॲपलच्या युक्तिवादानुसार, चौकशी भारतीय अॅप स्टोअरवर आधारित आहे, त्यामुळे फक्त त्याच उत्पन्नावर दंड आकारला जावा. कंपनीचे म्हणणे आहे की भारताचा नवीन नियम तत्त्वाच्या विरोधात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयानुसार, संबंधित उलाढालीवरच दंड ठोठावला जावा, तर जागतिक उत्पन्नावर दंड लावणे चुकीचे आहे.


सीसीआयचे म्हणणे आहे की, स्थानिक उत्पन्नावर दंड लावल्यास मोठ्या टेक कंपन्यांवर परिणाम होत नाही. त्यामुळे जागतिक उत्पन्नावर दंड ठोठावून कंपन्यांना भारतीय कायद्याचे पालन करण्यास भाग पाडले जाते. भारताचा असा युक्तिवाद आहे की मोठ्या कंपन्यांच्या जागतिक कार्यपद्धतीवरही कायद्याचा परिणाम समान असावा.


हा वाद सध्या न्यायालयात आहे. जर ॲपलची याचिका मान्य झाली, तर दंड फक्त भारतातील व्यवसायांपुरता मर्यादित राहील. मात्र जर न्यायालयाने नवीन नियमांना मान्यता दिली, तर CCI ला जगातील सर्वात मोठ्या दंडात्मक अधिकार मिळतील, ज्याचा परिणाम ॲपलसह गुगल, मेटा आणि ॲमेझॉन सारख्या इतर टेक कंपन्यांनाही भोगावा लागू शकतो.

Comments
Add Comment

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं

दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज सेवा तीर्थ, कर्तव्य भवनाचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 'सेवा तीर्थ' आणि 'कर्तव्य भवन-१ आणि २'चे उद्घाटन करणार आहेत. नव्याने

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या संसद