कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रि‍पदासाठी संघर्ष, सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष मठांपर्यंत पोहोचला

नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष आता राज्यातील मठांपर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्रि‍पदासाठी सुरू झालेला हा संघर्ष हळू हळू तीव्र होऊ लागला आहे. या संघर्षामुळे काँग्रेसचे कर्नाटकमधील राजकीय समीकरण बिघडण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोघेही स्वतःचा गट मबजूत करण्यासाठी तसेच प्रतिस्पर्धी गटाला कमकुवत करण्यासाठी शह काटशहचे राजकारण करू लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिस्पर्धी आमदारांना स्वतःच्या गटात ओढण्यासाठी ५० कोटी रुपये, फ्लॅट, लक्झरी कार अशा स्वरुपाची आमिषं दिली जात आहेत.


मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्षात आता वोक्कालिगा समाजाचा आदिचुंचनगिरी मठ ओढला गेला आहे. आदिचुंचनगिरी मठाचे प्रमुख निर्मलानंद नाथ स्वामी यांनी जाहीररित्या डी. के. शिवकुमार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशाराही दिला आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी दलित आणि ओबीसी नेत्यांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ता स्थापनेवेळी सिद्धरामय्या अडीच वर्ष मुख्यमंत्री राहतील नंतर हे पद डी. के. शिवकुमार यांना दिले जाईल, असा तोंडी करार झाला होता. पण अडीच वर्ष उलटली तरी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पद सोडलेले नाही. यामुळेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ओबीसी गटातील कुरुबा समाजाचे प्रतिनिधित्व करतात तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे वोक्कालिगा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. राजकीय संघर्ष वाढला तर कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मतपेढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांवर कर्नाटकचा राजकीय पेच सोडवण्यासाठीचा दबाव वाढत चालला आहे.

Comments
Add Comment

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

नंदुरबार : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या

ठाकरे बंधूंची युती होताच भाजपने दिला मोठा दणका

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महापालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

बंदी असलेल्या गांजा आणि चायनीज मांजाची पुण्यात राजरोस विक्री

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आणि त्यांच्या आसपासच्या भागात बंदी असलेल्या गांजा या

शरद पवारांच्या पक्षाला भगदाड, शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा राजीनामा

पुणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान