प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार


मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या


मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून या प्रारुप मतदार यादीतील त्रुटीबाबत हरकती तथा सूचना मांडण्याच्या तारखेला मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी हरकती व सूचना मांडण्याची तारीख २७ नोव्हेंबर होती. परंतु आता याला मुदतवाढ देवून ही तारीख ३ डिसेंबर २०२५ अशी करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मंगळवारी २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत महापालिकेच्या २६ प्रशासकीय विभागांमध्ये तब्बल ७६९ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.


गुरुवारी २७ नोव्हेंबर रेाजी शेवटची तारीख असल्याने मंगळवारी ५२९ आणि बुधवारी १३८८ अशा सर्वाधिक हरकती व सूचना या दोन दिवशी प्राप्त झाल्या.परंतु राज्य निवडणूक आयोगाने २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींकरता मतदार यादीचा कार्यक्रम दिला असून त्यानुसार प्रत्येक महापालिकेत सुधारणा करण्यात येत आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेने प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केलेली आहे. यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ ही हरकती व सूचना नोंदण्यासाठी अंतिम तारीख होती. परंतु ही तारीख वाढवून आता ३ डिसेंबर २०२५ करण्यात आली आहे.


तर प्रारुप मतदार यादीवरील दाखल हरकतीवर निर्णय घेवून प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या बनवून प्रसिध्दी करण्याची तारीख जी ५ डिसेंबर होती, ती वाढवून १० डिसेंबर २०२५ करण्यात आली आहे. तर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिध्द करण्याची तारीख ८ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबर करण्यात आली आहे आणि मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख १२ डिसेंबर ऐवजी आता २२ डिसेंबर करण्यात आली आहे.



प्रारुप मतदार यादीवर हरकती सूचना नोंदवण्याचा कालावधी वाढवून दिला असला तरी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख असल्याने सर्व पक्षांकडून ही कामे तातडीने पूर्ण करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. त्यामुळे त्यामुळे आता राजकीय पक्षांसह इतरांनाही घाईघाईत हरकत घेण्याऐवजी यादीवर शेवटची नजर मारण्याची संधी प्राप्त झाली आहे. बुधवार पर्यंत सात दिवसांमध्ये २१६७ हरकती सूचना प्राप्त झाल्याने पुढील दिवसांमध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




प्राप्त हरकती व सूचना


दिनांक २० नोव्हेंबर २०२५ : ०१


दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ : २२


दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ १९


दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ : १९


दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ : १७९


दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ : ५२९
दिनांक २६ नोव्हेंबर २०२६: १३८८




सर्वांत जास्त हरकती व सूचना आलेले प्रशासकीय विभाग(मंगळवार पर्यंत)


गोंवडी देवनार (एम पूर्व) : २०४


मुलुंड (टी विभाग) :१२३


कुर्ला (एल विभाग) : ५६


शीव, वडाळा(एफ उत्तर) ४७


वांद्रे,खार, सांताक्रुझ पूर्व(एच पूर्व ):४३




सर्वांत कमी हरकती व सूचना आलेले प्रशासकीय विभाग(मंगळवार पर्यंत)


मस्जिद बंदर(बी विभाग) : ०१


परळ, शिवडी(एफ दक्षिण) : ०१


कुलाबा,फोर्ट, नरिमन पॉईंट(ए विभाग) : ०२


वरळी, लोअर परळ(जी दक्षिण ): ०२


चंदनवाडी,गिरगाव(सी विभाग) :०३

Comments
Add Comment

बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात