‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अभिनेत्री इशा केसकरने मालिका सोडण्याचा केला खुलासा

मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेतील कलाच्या पात्राची एंट्री आता संपली आहे. या बदलामुळे चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर चाहते कमेंट्समध्ये नाराजी व्यक्त करत होते. मात्र, मालिकेतून कलाचे जाणे फक्त कथानकाच्या बदलामुळे नव्हे, तर त्यामागे खरं कारण अभिनेत्री इशा केसकरनेच स्पष्ट केले आहे.


‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत सध्या नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नक्षत्रा मेढेकरची नव्या पात्राची एन्ट्री झाली असून, अनेकांनी गृहित धरणे सुरू केली होती की तिच्या येण्यामुळेच इशा केसकर मालिके सोडत आहे. परंतु खऱ्या कारणाचा उलगडा अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला.


इशा केसकरने सांगितले की, सलग दोन वर्ष काम करत असताना जून महिन्यात तिच्या डोळ्याला दुखापत झाली होती. सुरुवातीला तिने शूटिंग सुरूच ठेवले, पण दुखापतीच्या गंभीरतेमुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. "विश्रांती न घेतल्यास भविष्यात डोळ्याची शस्त्रक्रिया करावी लागेल. १५ ते २० दिवस मी सूर्यप्रकाश देखील पाहू शकणार नाही," असे तिने सांगितले. त्यामुळे परिस्थिती गंभीर असल्याने तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि सप्टेंबरपासूनच टीमला हे सांगितले होते.


तिने पुढे सांगितले की, मागील काळात तिला चिकनगुनिया आणि अन्नामुळे विषबाधा देखील झाली होती, त्यावेळी टीमने तिची खूप काळजी घेतली. "पुन्हा सुट्टी मागणं मला योग्य वाटले नाही. मालिकेच्या कथेत अडथळा येऊ नये म्हणून मी स्वतः निर्णय घेतला," असेही तिने स्पष्ट केले.


इशा केसकरने शेवटी असे सांगितले की, "आपण मेहनत करून पैसे कमवतो, पण त्याचा आनंद घेता आला नाही तर त्याचा अर्थ काय? म्हणून मी थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे."

Comments
Add Comment

'हि-मॅन'ला शेवटचे पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता; नवीन वर्षाची सुरुवातच होणार देशभक्तीने

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र बॉलिवूडचा हि-मॅन कायमच आपल्या

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची