मोहित सोमण:अशोक लेलँड समुहाने हिंदुजा लेलँड फायनान्सचे एनडीएल वेंचर लिमिटेडमध्ये विलीन करण्यास मान्यता दिली आहे. माहितीनुसार या विलीनीकरणात (Merger) शेअर एक्सचेंजमध्ये १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या इक्विटी शेअरचे गुणोत्तर लेलँड फायनान्सचे १० शेअर म्हणजे एनडीएल वेंचर लिमिटेडसाठी २५ शेअर असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या निवेदनात हे स्पष्ट केले आहे. संचालक मंडळाने या निर्णयाला मान्यता दिली असली तरी अद्याप सेबीची मंजूरी अद्याप कंपनीला मिळालेली नाही. यापूर्वी कंपनीला आरबीआयकडून विना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाली होती. सेबी शिवाय अद्याप एनसीएलटी (National Company Law Tribunal) यांच्याकडून विलीनीकरणासाठी मंजूरी येणे बाकी आहे. भागभांडवलधारकांची मंजूरीही कंपनीच्या प्रस्तावाला आवश्यक असेल.
यापूर्वी आरबीआयने ११ ऑगस्टला ना हरकत प्रमाणपत्र कंपनीला दिले होते. या विलीनीकरणानंतर हिंदुजा लेलँड फायनान्सचे स्वतंत्र अस्तित्व असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशनल कार्यात सु़धारणा, भांडवलांचा योग्य विनियोग, उत्पादकता वाढवण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
या विलीनीकरणाचा उद्देश एनडीएल व्हेंचर्सना नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) क्षेत्रात विस्तार करण्यास, शेअरहोल्डर मूल्य वाढविण्यास आणि भांडवल उभारणीच्या संधी वाढविण्यास मदत करणे आहे. विलीनीकरणाच्या घोषणेमुळे आज अशोक लेलँडच्या शेअरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. आज कंपनीचा शेअर २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ५२ आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर पोहोचला. कंपनीच्या शेअरने सकाळच्या सत्रात ५% वाढ नोंदवल्याने १४६.४५ रूपये प्रति शेअरचा विक्रम नोंदवला आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ५.४९% उसळत १५७.१३ रूपयावर व्यवहार करत होता.