सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या राज्यस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांसमोर आढावा


मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या विकासाच्या गरजा, पर्यटनवाढ, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करता जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची मागणी पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.



जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी गुरुवारी मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, वित्त व नियोजन राज्यमंत्री  आशिष जैसवाल, आमदार  दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती तसेच ग्रामीण व नागरी भागातील विकासकामांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या सुरू असलेल्या तसेच आगामी काळात प्रस्तावित विकासकामांची प्रभावी, दर्जेदार व वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा नियोजन निधीत वाढ करण्याची मागणी या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या तसेच आगामी काळात प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडत, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक निधीची गरज स्पष्ट केली.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या