काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) आणि महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) यांचा एक एआय (AI) व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. गौतमी आणि अभिजीतने स्वतःच्या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. 'सबसे कातील गौतमी पाटील' आणि सदाबहार गाण्यांसाठी ओळखले जाणारे गायक अभिजीत सावंत यांचा हा रोमँटिक अंदाज पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, आता या व्हिडिओमागचे खरे कारण समोर आले आहे. हा एआय व्हिडिओ त्यांच्या आगामी प्रोजेक्टची केवळ एक झलक होती, हे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गायक अभिजीत सावंत लवकरच एका नव्या गाण्यातून रसिकांच्या भेटीला येणार आहेत. या गाण्याचा सर्वात मोठा ट्विस्ट (Twist) म्हणजे, या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील देखील अभिजीतसोबत काम करताना दिसणार आहे. पहिल्यांदाच ही अनोखी जोडी एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र येत असल्याने चाहत्यांमध्ये या गाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकांमुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Legislature Session) तारखेचा मुहूर्त अखेर ठरला आहे. ...
गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) यांनी २०२५ या वर्षात 'चाल तुरु तुरू' आणि नुकतेच प्रदर्शित झालेले 'आय पॉपस्टार'मधील 'मोहब्बते लुटाऊंगा' चे नवंकोरं 'जेन-झी' (Gen-Z) व्हर्जन अशा अनेक ट्रेंडिंग गाण्यांनी प्रेक्षकांना मोहित केले आहे. आपल्या सुमधूर आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अभिजीत आता अजून एका नव्या गाण्यामधून भेटीला येत आहे. अभिजीतचे हे नवंकोरं गाणं 'रुपेरी वाळूत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील देखील अभिजीत सावंतसोबत वेगळ्या आणि आकर्षक अंदाजात काम करताना दिसणार आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. हे बहुप्रतिक्षित गाणं येत्या ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 'रुपेरी वाळूत' हे गाणे जुन्या गाण्याचा नवा ट्विस्ट (Twist) असणार की अभिजीत आणि गौतमी काहीतरी नवीन घेऊन येणार, हे जाणून घेण्यासाठी आता चाहत्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अभिजीतच्या आवाजाची जादू आणि गौतमीचा खास अंदाज यामुळे हे गाणं नक्कीच हीट होण्याची शक्यता आहे.
गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) आणि नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) यांचा आगामी अल्बम 'रुपेरी वाळूत' सध्या जबरदस्त चर्चेत आहे. या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे दोघांचे समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पाहून चाहत्यांनी आधीच उत्सुकता व्यक्त केली होती, आणि आता गाण्याचे नाव जाहीर झाल्यावर ती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जुने गाणे की नवा प्रयोग? 'रुपेरी वाळूत' हे नाव ऐकल्यानंतर प्रेक्षकांना लगेचच 'रुपेरी वाळूत माडाच्या बनात..' या तुफान गाजलेल्या जुन्या गाण्याची आठवण झाली आहे. त्यामुळे अभिजीत सावंत या गाण्याचे नवीन व्हर्जन घेऊन येत आहेत की, या शीर्षकाखाली काहीतरी वेगळा आणि नवा प्रयोग करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
'सबसे कातील' गौतमी पाटीलचा प्रवास नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. तिचा एकही कार्यक्रम हाऊसफुल्ल होत नाही, असे होत नाही. त्याचप्रमाणे, वाद आणि गौतमी पाटील हेही जणू एक समीकरण बनले आहे. तिच्या कार्यक्रमांमध्ये कधी राडे होताना दिसतात, तर कधी पोलीस संरक्षण पुरवू न शकल्यामुळे कार्यक्रम रद्द झाल्याच्या बातम्याही येतात. मात्र, याच गौतमीने स्टेज शोसोबतच काही मराठी चित्रपटांच्या गाण्यांमध्येही हजेरी लावली आहे. आता अभिजीत सावंतसारख्या लोकप्रिय गायकासोबत तिचा हा अल्बम चर्चेचा विषय बनला आहे.