Tata Investment Corporation Share Surge: टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन शेअर्समध्ये तुफानी ८.३१% उसळला,टेक्निकल पोझिशन मजबूत स्थितीत!

मोहित सोमण: आज टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान वाढ झाली आहे. सातत्याने रेकॉर्ड ब्रेक पातळीवर शेअर घसरत असताना बदलत्या आर्थिक संकेतामुळे व बाजारातील तेजीमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली व शेअर आज ८.३१% इंट्राडे उच्चांकावर (Intradday All time High) व्यवहार करत होता. हा शेअर ८.३१% उसळल्याने ७८६.९१ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. सकाळी १०.५५ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ७.०३% उसळत ७७७.६० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. प्रामुख्याने शेअर्समध्ये मोठी प्राईज करेक्शन झाली आहे.यापूर्वी कंपनीचा शेअर सातत्याने ७ सत्रात घसरला होता. परवा शेअर २५% कोसळला होता तर कालही शेअर ५ ते ६% कोसळला होता. एकूण सात सत्रात शेअर ३ ऑक्टोबर रोजी असलेल्या इंट्राडे उच्चांकावर (११८४ प्रति शेअर) वरून ३३.७५% कोसळला होता.


तांत्रिक दृष्ट्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनची किंमत सध्या त्यांच्या ५-दिवस (5Days) १००-दिवस (100 Days) आणि २००-दिवसांच्या (200 Days) एमवीए (Moving Average) मूव्हिंग अँव्हरेजपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या शेअरने अल्पकालीन आणि दीर्घकालीन तांत्रिक दृष्ट्या समर्थन पातळी (Support Level) राखण्यास यश प्राप्त केले आहे तथापि, शेअर याच्या २० दिवस आणि ५० दिवसांच्या मूव्हिंग अँव्हरेजपेक्षा कमी आहे, जे मध्यम कालावधीत काही प्रतिकार (Resistance) दर्शवत आहे हे तांत्रिकदृष्ट्या मिश्र तांत्रिक चित्र काही काळाच्या घसरणीनंतर शेअरच्या अलीकडच्या रिकवरीशी जुळत आहे.


एकूणच गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली असूनही शेअरने १.६६% वाढ नोंदवली असून संपूर्ण महिनाभरात ७.२६% घसरण नोंदवली आहे. संपूर्ण ६ महिन्याचा कालावधी पाहता २३.७१% व संपूर्ण वर्षात १६.३६% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील तुलनेत या एनबीएफसी (Non Banking Financial Services NBFC) कंपनीला १९.७८% अधिक निव्वळ नफा (Net Profit) मिळाला होता. तर कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) ८.०७% वाढ कंपनीने नोंदवली.

Comments
Add Comment

राष्ट्रवादी काँग्रेसची ३० उमेदवारांची तिसरी व अंतिम यादी जाहीर ; राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार निवडणूक रिंगणात...

९४ उमेदवारांमध्ये ५२ लाडक्या बहिणी निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार ; लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी... मुंबई : मुंबई

'जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा'

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण

शिवडीत सिलेंडर स्फोट, गुरुकृपा चाळीत अग्नितांडव; ५ ते ६ घरे जळून खाक

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असताना शिवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर

Stock Market Closing: शेअर बाजारात अखेरच्या निफ्टी एक्सपायरीत अखेरच्या सत्रात रिकव्हरी मात्र किरकोळ घसरण कायम

मोहित सोमण:अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २०.४६ अंकाने घसरत ८४६७५.०८

एनएसईकडून गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्वाची सूचना- भामट्यांची माहिती वाचा नावासकट!

मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) ने गुंतवणूकदारांना काही अपंजीकृत व्यक्ती (Unregistered) आणि

 मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढणार  

अजुनही वेळ गेलेली नाही, भाजपने आपल्या कोटयातील १२  जागांवर माघार घेवून रिपब्लिकन कार्यकर्त्यांना संधी द्यावी