मुंबईतील भायखळ्यात लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

मुंबई: भायखळ्यातील जयकृपा टॉवरमध्ये लिफ्ट कोसळली आहे. या लिफ्ट अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ११ फेब्रुवारी रोजी रात्री भायखळ्यातील जयकृपा टॉवरमधील घोडापदेव क्रॉस लेन क्रमांक १ येथे ही दुर्घटना घडली आहे.


भायखळ्यातील जयकृपा टॉवरमध्ये केबल तुटल्यामुळे लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळली. यानंतर तात्काळ मुंबई अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि बीएमसीचे वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.


भायखळ्यातील लिफ्ट अपघातात एकूण पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी तीन जणांना जे.जे. रुग्णालयात, एकाला बालाजी रुग्णालयात तर एकाला जसलोक रुग्णालयात हलवण्यात आले. जे. जे रुग्णालयात कल्पिता पवार, यश बालविकर आणि उषा गुप्ता यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. बालाजी रुग्णालयात जमुना प्रसाद शिवहरे तर जसलोक रुग्णालयात शिल्पा मोरे यांच्यावर उपचार केले जात असून त्यांचीही प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळाली आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेतर्फे 'उर्स' उत्सवासाठी ४ अनारक्षित विशेष गाड्या

मुंबई : 'उर्स' उत्सवासाठी प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज

Central Railway Mega Block : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, मेन आणि हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा प्रभावित

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवार, दि. १२ जुलै रोजी मेन आणि

BEST Bus Accident : मुंबईत बेस्ट बसचा अपघात, बसची १४ वाहनांना धडक; अनेक जखमी

मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात शुक्रवारी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने बसवरील

Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच रिव्हर्स मायग्रेशन सुरू होणार

पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास; जहाज बांधणीसह मत्स्य-बंदर क्षेत्रात असंख्य प्रकल्प येणार मुंबई :

Mumbai Redevelopment : मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

 म्हाडा सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर; न्यायालयीन आणि प्रशासकीय अडचणी होणार दूर मुंबई : दक्षिण मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : शर्तभंग झालेल्या जमिनी सरकार जमा करणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश मुंबई : राज्यातील सिडको, नैना, एमएमआरडीए(MMRDA) तसेच विविध नगरपालिका आणि