मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेतून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. प्राणीसंग्रहालयातील शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी घोषिक करण्यात आले. खरंतर या वाघाचा मृत्यू १७ नोव्हेंबर रोजी झाला होता. परंतू आज सकाळी तब्बल आठ दिवसांनंतर मृत्यूबाबत सांगण्यात आले आहे. यामुळे वाघाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात असून प्राणीसंग्रहालाच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयातील शक्ती वाघ २०२०मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आलेला होता. जेव्हा या वाघाला संग्रहालयात आणले गेले तेव्हा तो अवघ्या साडेतीन वर्षांचा असून आता त्याचे वय १० वर्ष होते. या वाघाचा मृत्यू अपस्माराचे झटके आल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती मिळली आहे. मात्र उद्यान व्यवस्थापनाकडून वाघाच्या मृत्यूची माहिती आठ दिवस का लपवली गेली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शक्ती वाघाला राहण्यासाठी प्रशासनाने उद्यानात नैसर्गिक अधिवास केला होता. वाघाला खाण्यासाठी मांसाहार आणि मुबलक पाणी असायचे. तसेच बसण्यासाठी आणि फिरण्यासाठी ठिक-ठिक ठिकाणी लहानसे पाणवठेही तयार करण्यात आले होते. शक्ती वाघासोबत 'जय' नावाचा दुसरा वाघ आणि करिश्मा वाघीण एकत्र राहत होते. परंतू १७ नोव्हेंबर रोजी शक्ती वाघाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर फिट्स आल्याने मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.
ठाणे : डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पलावा सिटीसमोरील खाडीमध्ये तीन दिवसांपूर्वी एका मोठ्या सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला ...
भायखळ्याच्या राणी बागेत घडलेल्या या प्रकरणानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश जगताप यांनी दावा केला आहे की, शक्ती वाघाचा मृत्यू मांस खाताना हाड श्वसननलिकेत अडकल्यामुळे झालेला आहे. तसेच ज्या वेळेस वाघाचा मृत्यू झाला त्याची माहिती कायद्यानुसार महाराष्ट्र झू अथोरिटी आणि सेंट्रल झू अथोरिटीला सविस्तर सांगणे आवश्यक होते, मात्र ही माहिती फक्त ई-मेलने कळवण्यात आलेली होती. यामुळे संग्रहालय व्यवस्थापनाच्या कामकाजावर प्रश्न निर्माण होत आहे.