मोहित सोमण: युएस बाजारातील तेजी व फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची जोरदार चर्चा यामुळे युएससह आशियाई शेअर बाजारातील मोठी वाढ झाल्याने आज भारतीय बाजारातही रॅलीची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली आहे. सेन्सेक्स २७०.५० अंकाने व निफ्टी ८९.२५ अंकांने उसळला आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीतही चांगली वाढ झाल्याने आज बाजारात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे. एकूणच मिड व स्मॉल कॅप सह बँक, मेटल, फायनाशियल सर्विसेस शेअर्समध्ये झालेल्या वाढीचा फायदा बाजारात झालेला दिसतो. विशेषतः सकाळी लार्जकॅप निर्देशांकापेक्षा मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये अधिक वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मेटल (१.७०%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.८०%),मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (१.०९%) निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात निफ्टी स्मॉलकॅप ५० (१.१२%), निफ्टी स्मॉलकॅप १०० (१.००%), मिडकॅप १०० (०.६५%), मायक्रोकॅप २५० (०.८४%) निर्देशांकात वाढ झाली आहे.
सुरूवातीच्या कलात टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (८.१३%), रिलायन्स पॉवर (४.६०%), सम्मान कॅपिटल (४.५३%),नुवामा वेल्थ (४.१९%), सीईएससी (३.३४%), ग्राविटा इंडिया (३.१७%), जेएम फायनांशियल (३.११%), टाटा मोटर्स पीव्ही व्हेईकल (२.७७%), अनंत राज (२.६२%) समभागात सर्वाधिक वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण सीपीसीएल (४.६५%), भारती एअरटेल (२.१७%), टीआरआयएल (२.१२%), असाही इंडियन ग्लास (१.९७%), एमआरपीएल (१.८०%), दीपक फर्टिलायजर (१.३१%), भारती हेक्साकॉम (१.४८%), ज्योती सीएनसी ऑटो (१.२९%), बालकृष्ण इंडस्ट्रीज (१.२७%), बर्जर पेंटस (१.१७%) समभागात झाली आहे.
बाजार सत्रपूर्व परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'कधीकधी बाजार कोणत्याही स्पष्ट तर्क आणि कारणाशिवाय घसरतो. अल्पकालीन हालचाल उदयोन्मुख मूलभूत गोष्टींविरुद्ध असू शकते. या अनिर्णीत हालचालीचे स्पष्टीकरण फ्युचर्स एक्सपायरी डेटशी संबंधित तांत्रिक आणि बाजार स्थितीमध्ये आढळू शकते. बहुतेकदा, एक्सपायरी डेटवर शॉर्ट आणि लॉंग पोझिशन्स कव्हर करण्याशी संबंधित सट्टेबाजीच्या क्रियाकलापांना प्रतिसाद म्हणून बाजार उच्च अस्थिरता पाहतो. काल निफ्टीमध्ये ४६९७ कोटी रुपयांचा सकारात्मक संस्थात्मक खरेदीचा आकडा असूनही कालची ७४ अंकांची घसरण ही अशाच समाप्तीशी संबंधित अस्थिरतेची उदाहरण आहे. संबंधित प्रश्न असा आहे: बाजारातील अशा अनिर्णीत हालचालींदरम्यान गुंतवणूकदारांनी काय करावे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम धोरण म्हणजे व्यापार करण्यापासून परावृत्त करणे आणि हळूहळू परी-मूल्यांकित उच्च दर्जाचे वाढीचे स्टॉक जमा करणे जे वाढत्या अस्थिरतेमुळे आकर्षक मूल्यांकनांवर उपलब्ध असतील. असे स्टॉक लवकरच परत येतील. अशा संदर्भात गुंतवणूकदारांचे मानसिक वर्तन अधिक महत्त्वाचे आहे.मूलभूत गोष्टी सूचित करतात की बाजार एका नवीन उच्चांकाकडे जात आहे: हा फक्त वेळेचा प्रश्न आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद या समजुतीवर आधारित असावा.'
सकाळच्या सत्रातील टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'गेल्या गुरुवारपासून सुरू झालेली घसरण आता आमच्या २५८२६ पातळीच्या घसरणीच्या दिशेने पसरली आहे. येथून आम्ही २६५५० किंवा त्याहून अधिकचे लक्ष्य ठेवून उलट दिशेने वाटचाल करत आहोत. पर्यायी, २६०७० पातळीच्यावर तरंगण्यास असमर्थता ही घसरणीची पुष्टी करेल, सुरुवातीला २५७५०-२५४६० चे लक्ष्य ठेवले आहे.'