आजपासून मदर न्यूट्री फूडस व के के सिल्क मिल्स आयपीओ मैदानात, दुपारपर्यंत 'इतके' सबस्क्रिप्शन यामध्ये गुंतवणूक करावी का? इत्यंभूत माहिती एका क्लिकवर!

मोहित सोमण: आजपासून मदर न्यूट्री फूडस लिमिटेड (Mother Nutri Foods Limited) व के के सिल्क मिल्स लिमिटेड (K K Silk Mills Limited) हे दोन आयपीओ (IPO) बाजारात दाखल झाले आहेत. जाणून घेऊयात इत्यंभूत माहिती....


१) Mother Nutri Foods Limited- पहिल्या दिवशी कंपनीच्या आयपीओला ११.५१ वाजेपर्यंत एकूण ०.१२ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यापैकी किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.१३ वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.२६ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. हा आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला असून परवा २८ नोव्हेंबर पर्यंत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठ उपलब्ध असणार आहे. ३९.५९ कोटी रुपये बुक व्हॅल्यू मूल्यांकन असलेल्या आयपीओत विक्रीसाठी ०.२७ कोटी शेअर (३१.६७ कोटी रूपये) शेअर फ्रेश इशूसाठी उपलब्ध असतील तर ०.०७ कोटी शेअर (७.९२ कोटी रूपये) शेअर ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत उपलब्ध असणार आहेत. कंपनीने आयपीओसाठी १११ ते ११७ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओतील गुंतवणूकीसाठी किमान २८०८०० रूपयांची (२४०० शेअर) गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच माहितीनुसार ३ डिसेंबरला कंपनी बीएसई एसएमईवर सूचीबद्ध (Listed) होणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे (Shares) वाटप (Allotment) १ डिसेंबरपर्यंत होऊ शकते. Marwadi Chandrana Intermediaries Brokers Pvt Ltd कंपनी बूक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून BigShare Services Private Limited कंपनी रजिस्ट्रार व मार्केट मेकर म्हणून Mansi Share and Stock Broking Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी काम करणार आहे. ३३८४००० शेअरचा एकूण पब्लिक इशू असणार आहे. त्यापैकी २४३६०० शेअर मार्केट मेकरसाठी राखीव असतील तर उर्वरीत २४६३६०० शेअर फ्रेश इशू व ६७६८०० शेअर ऑफर फॉर सेलसाठी उपलब्ध असतील. चिंतन ठकार, उमेशभाई शेठ, रजनीकांत ठकार, पार्थ शेठ, नयनाबेन ठकार, वंदनाबेन शेठ हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. कंपनीने आयपीओआधीच अँकर गुंतवणूकदारांकडून काल १०.९९ कोटी रूपये प्राप्त केले आहेत.


एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी ७.२०%, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ४६.३८%, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १३.९४%, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३२.४८% वाटा उपलब्ध असणार आहे. कंपनी २०२२ साली स्थापन करण्यात आली असून मदर न्यूट्री फूडस लिमिटेड B2B (Business to Business) शेंगदाणे, बटर उत्पादक आहेत. १० पेक्षा अधिक फ्लेवर कंपनी बाजारात ऑफर करते. तसेच बटर शेंगदाणे संबंधित ५ फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत.


कंपनी 'स्प्रेड अँड ईट' या ब्रँड अंतर्गत आपली उत्पादने बाजारात आणते. लिबिया, दुबई आणि अलीकडे जपानमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही उत्पादने विकली जातात. स्वतःच्या ब्रँडसोबतच, कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी खाजगी लेबलिंग करते, हायपरमार्केट, सुपरमार्केट आणि रिटेल चेन देखील पुरवते.


कंपनीचा प्रामुख्याने ग्राहकबेस युनायटेड किंग्डम, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, रशिया, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, स्पेन, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, नेपाळ, बांगलादेश, फिलीपिन्स, मेक्सिको, कुवेत, इस्रायल, युनायटेड स्टेट्स, ओमान, केनिया, जर्मनी आणि पोर्तुगाल यासह अनेक देशांमध्ये पसरलेला आहे.कंपनी महुवा, भावनगर, गुजरात, भारत येथे एकच उत्पादन प्रकल्प चालवते.


यापूर्वी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर १२% अधिक महसूल मिळाला होता तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) इयर ऑन इयर बेसिसवर ३५% वाढ झाली होती. तर कंपनीच्या ईबीटा (EBITDA) (करपूर्व कमाई) तिमाही बेसिसवर (Quarter on Quarter QoQ) मार्च महिन्यातील १०.२२ कोटींच्या तुलनेत या सप्टेंबर तिमाहीत मात्र ७.४४ कोटींवर घसरण झाली आहे. तसेच कंपनीच्या एकूण उत्पन्नात तिमाही बेसिसवर ६.४७ कोटीवरून ५.३२ कोटींवर घसरण झाली होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी नव्या उत्पादन प्रकल्पासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी (General Corporate Purposes) वापरणार आहे. सध्या ग्रे बाजारात कंपनीच्या मूळ प्राईज बँडपेक्षा कुठलाही बदल झालेला नाही.


हा आयपीओ सबस्क्राईब करावा का?


बाजार व आयपीओतज्ज्ञ दिलीप दावडा यांनी म्हटले आहे की,' कंपनी बी२बी मॉडेलवर पीनट बटरचे उत्पादन आणि विपणन (Marketing) करते. अहवाल दिलेल्या कालावधीत त्यांनी त्यांच्या टॉप आणि बॉटम लाईन्समध्ये वाढ नोंदवली आहे, परंतु आर्थिक वर्ष २४ पासून त्यांच्या बॉटम लाईन्समध्ये अचानक वाढ होणे आश्चर्यकारक आहे. खाजगी लेबलिंग व्यवसायातून त्यांचा सरासरी ९७% पेक्षा जास्त महसूल आहे, ज्यामध्ये सुमारे ६८% देशांतर्गत आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय समावेश आहे. त्यांच्या अलीकडील आर्थिक डेटाच्या आधारे सुज्ञ गुंतवणूकदार (Well Informed Investorrs) मध्यम ते दीर्घकालीन निधी उभारू शकतात. '


२) K K Silk Mills Limited- आजपासून कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल झाला असून २८ नोव्हेंबरपर्यंत बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल असेल. पहिल्या दिवशी कंपनीला दुपारी १२.११ वाजेपर्यंत एकूण ०.३० वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.५४ वेळा, ०.०७ वेळा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून आयपीओला सबस्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३ डिसेंबरला हा आयपीओ बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. माहितीनुसार, ३६ ते ३८ रूपये प्रति शेअर एवढी प्राईज बँड निश्चित करण्यात आली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान २२८००० रूपयांची (६००० शेअर) गुंतवणूक आयपीओसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. एकूण २८ कोटी रुपये बुक व्हॅल्यू मूल्यांकन असलेल्या आयपीओत ०.७५ कोटीचा फ्रेश इशू असणार आहे. Axis Capital Private Limited कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून MUFG Intime India Private Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे तर मार्केट मेकर म्हणून Afrertrade Broking Pvt Ltd कंपनी मार्केट मेकर म्हणून काम करेल.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) १ डिसेंबरला होणार असून ३ डिसेंबरला शेअर बीएसई एसएमईवर सूचीबद्ध होणार आहे. एकूण ७५०००० शेअरचा हा पब्लिक इशू असून त्यापैकी ३७५००० शेअर मार्केट मेकरसाठी राखीव असतील तर उर्वरीत ७१२५००० शेअर सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असतील. मनिष शाह, निलेश शाह, आशाबेन शहा हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी मार्केट मेकरसाठी ५.०%, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ०.९६%, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ४७%, किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांसाठी ४७.०४% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.


ऑगस्ट १९९१ मध्ये स्थापन झालेली के के सिल्क मिल्स लिमिटेड ही कापडांसह कपड्यांचे उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये (Product Line) मुलांचे कपडे, पुरुषांचे व महिलांचे कपडे यांचा समावेश आहे.


कंपनी पुरुषांचे शर्ट, औपचारिक आणि कॅज्युअल कपडे, शेरवानी साहित्य, महिलांचे ड्रेस मटेरियल, बुरखा साहित्य आणि कुशन कव्हर मटेरियल यासह विविध उत्पादनांसाठी कापड तयार करते.कंपनी सूटिंग आणि शर्टिंग फॅब्रिक्स, कॉर्पोरेट कपडे, पुरुषांचे कपडे बाजारात उपलब्ध करते. कंपनी गुजरातमधील उंबरगाव येथील तिच्या अत्याधुनिक उत्पादन युनिटसाठी ओळखली जाते.


यापूर्वी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर १६% अधिक महसूल यंदा मिळाला असून कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर १०७% अधिक करोत्तर नफा (PAT) मिळाला आहे. तिमाही बेसिसवर कंपनीच्या करोत्तर नफ्यात मार्चमधील ४.६८ कोटीवरून जून तिमाहीत १.५१ कोटींवर घसरण झाली आहे. तसेच तिमाही बेसिसवर कंपनीच्या ईबीटात १३.९९ कोटींवरून ४.०१ कोटींवर घसरण झाली आहे. तर कंपनीच्या उत्पन्नात तिमाही बेसिसवर २२१.४३ कोटीवरुन ५४.५१ कोटींवर घसरण झाली आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ८५.२७ कोटी रुपये आहे. पहिल्या दिवशी कंपनीची जीएमपी मूळ प्राईज बँड पेक्षा ७ रूपये अधिक प्रिमियमसह व्यवहार करत असल्याने या आकडेवारीनुसार १८% प्रिमियम दर सध्या सुरू आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर भांडवली खर्चासाठी, प्री पेमेंट, थकीत देणी चुकती करण्यासाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.


हा आयपीओ सबस्क्राईब करावा का?


बाजार व आयपीओतज्ज्ञ दिलीप दावडा म्हणाले आहेत की,' कंपनी कापड आणि वस्त्रोद्योगाच्या उत्पादनाच्या व्यवसायात गुंतलेली आहे. अहवाल दिलेल्या कालावधीत कंपनीने तिच्या नफ्यात आणि नफ्यात वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २५ पासून (म्हणजेच, आयपीओपूर्वीच्या कालावधीत) तिच्या नफ्यात अचानक वाढ झाल्याने त्याच्या शाश्वततेबद्दल चिंता आणि चिंता निर्माण झाली आहे. अलीकडील आर्थिक आकडेवारीनुसार, हा मुद्दा आक्रमकपणे किमतीचा असल्याचे दिसून येते. या महागड्या आणि किचकट पैजांना वगळण्यात काहीही गैर नाही.'

Comments
Add Comment

Stock Market विशेष: शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टीत एक टक्क्यांहून अधिक उसळतोय नक्की का? व गुंतवणूकदारांनी काय करावे?

मोहित सोमण: जगभरात प्रभावशाली ठरणाऱ्या युएस अर्थव्यवस्थेतील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशावादाचा

Satara : काळजाचा ठोका चुकवणारा थरार! महामार्गावर बेदरकार मिनी ट्रॅव्हल्सचा कहर; एकाचा जागीच मृत्यू, थराराचा व्हिडिओ व्हायरल

सातारा : साताऱ्यातून (Satara) एक अत्यंत धक्कादायक आणि भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील बरड येथे संत

राणीबागेतील 'शक्ती' वाघाचा संशयास्पद मृत्यू! आठ दिवसांनंतर व्यवस्थापनाने केले उघड, का केली लपवाछपवी?

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेतून एक धक्कादायक

Sambhajinagar : धक्कादायक! जेवायला बसले अन् गवारच्या भाजीत आढळली पाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये २८ विद्यार्थ्यांना विषबाधा;

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे.

Mumbai Terror Attack : आग, धूर अन् रक्ताने माखलेली ती रात्र... २६/११ च्या भयावह रात्री 'या' ताज कर्मचाऱ्यांमुळे वाचले शेकडो जीव;

मुंबई : आजचा दिवस २६ नोव्हेंबर भारतीय आणि विशेषतः मुंबईच्या इतिहासातील सर्वात भयानक आणि वेदनादायी दिवसांपैकी एक

रशिया-युक्रेन युद्ध लवकरच संपणार? अमेरिकेच्या करार आराखड्यावर दोन्ही देशांची सहमती

अमेरिका: रशियासोबत युद्ध संपवण्यासाठी प्रस्तावित अमेरिकेच्या करार आराखड्यावर युक्रेनने सहमती दर्शविली आहे.