Gold Silver Rate Today: आज सलग तिसऱ्यांदा सोन्याचांदीत वाढ का? जाणून घ्या जागतिक विश्लेषण

मोहित सोमण:आज सलग तिसऱ्यांदा सोन्याच्या व चांदीच्या दरात वाढ झाली आहे. काल प्रति ग्रॅम दरात १९१ रूपयांनी वाढ झाल्यानंतर आज पुन्हा २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८७ रुपयांनी वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८७ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८० रुपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२७९१ रूपये, २२ कॅरेटसाठी ११७२५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९५९३ रूपयांवर पोहोचले आहेत. तर २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ८७० रूपये २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ८०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ६५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२७९१० रूपये, २२ कॅरेटसाठी ११७२५० रूपये, १८ कॅरेटसाठी ९५९३० रुपयांवर पोहोचले आहेत.


संकेतस्थळावरील माहितीनुसार,मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२७९१, २२ कॅरेटसाठी ११७२५,१८ कॅरेटसाठी ९५९३ रुपयांवर व्यवहार करत आहे. भारतातील कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांक संध्याकाळपर्यंत ०.६८% वाढ झाल्याने दरपातळी १२६०७४ रुपयांवर पोहोचला.


आज दिवसभरात डॉलर निर्देशांक (Dollar Index DXY) डॉलर निर्देशांक ९९.६० रूपयांवर घसरला होता आणि एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर हा दर पोहोचला ज्यामुळे परदेशी खरेदीदारांसाठी सोने गुंतवणूक महत्वाची ठरली. त्यामुळे १० वर्षांचा अमेरिकन ट्रेझरी उत्पन्न मागील सत्रात एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर राहिले आहे. आज सोन्यातील सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये सोने आणि चांदीचे दर अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढले होते. स्पॉट मार्केट मागणीतील वाढ आणि यूएस फेडच्या दर कपातीच्या आशेमुळे एमसीएक्स सोन्याचे फ्युचर ०.५०% व चांदीचे डिसेंबर फ्युचर्स ०.९१% वाढून १५७७५० प्रति किलोपर्यंत वाढले होते.


युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात होण्याची शक्यता जागतिक वर्तृळात निर्माण झाल्याने व आगामी बहुप्रतिक्षित युएस रोजगार, किरकोळ विक्री आकडेवारीमुळे शेअर बाजारासह सोन्याच्या दराने नवी उंची गाठली. दुसरीकडे रूपयांच्या बाबतीत रूपयात किरकोळ वाढ झाली असली तरी जागतिक स्तरावर सोने २ आठवड्याच्या उच्चांकी (All time High) पातळीवर पोहोचले असल्याने त्याचा परिणाम आज भारतीय सराफा बाजारात दिसला आहे


तज्ञांच्या मते, 'रशिया-युक्रेन युद्धाच्या आघाडीवरील सकारात्मक संकेत सोन्याच्या वाढीला मर्यादित करू शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावित अमेरिकेच्या पाठिंब्याने शांतता योजनेला चालना देण्यासाठी मॉस्को आणि कीवमध्ये समेट करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याने दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा युरोपीय संघर्ष लवकरच संपुष्टात येईल अशी आशा निर्माण झाली आहे.'


आजच्या सोन्याच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'कॉमेक्सच्या किमती ४१५० डॉलरच्या वर गेल्याने सोन्याचा भाव सकारात्मक राहिला, तर MCX सोन्याचा भाव ६५० ने वाढून १२५९०० वर पोहोचला. सोन्यातील तेजीचा वेग कायम आहे, सोमवारच्या सुरुवातीपासून किमती जवळजवळ २.५% वाढल्या आहेत. बाजाराचे लक्ष आता GDP आणि कोर PCE किंमत निर्देशांकासह प्रमुख अमेरिकन आर्थिक डेटावर केंद्रित झाले आहे, जे अल्पकालीन दिशा दर्शवेल. सोने १२४००० ते १२७५०० रूपयांच्या श्रेणीत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'


चांदीतही सलग तिसऱ्यांदा वाढ -


मोठ्या प्रमाणात चांदीच्या मागणीसह फेड दरातील कपातीमुळे आशावाद निर्माण झाल्याने चांदीच्या दरातही आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दर २ रूपयांनी, प्रति किलो दर २००० रूपयांनी वाढला. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १६९ व प्रति किलो दर १६९००० रूपयांवर गेला आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १६९० रूपये, प्रति किलो दर १७६००० रुपयांवर गेले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.८८% वाढ झाल्याने दरपातळी १५९२५९ रूपयांवर गेली.

Comments
Add Comment

मराठी शाळांबाबतच्या धोरणाविषयी काय म्हणाली मुंबई महापालिका ?

मराठी शाळांबाबत चुकीची माहिती; महापालिका प्रशासनाने मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळासमोर मांडली

RSS च्या शताब्दीनिमित्त ‘शतक : संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेच्या शंभर वर्षांच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘शतक : संघाचे १००

काय सांगता ? सोन्याचांदीच्या दरात झाली घसरण ?

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी

शीव उड्डाणपूल येत्या पावसाळ्यात होणार वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) उड्डाणपुलाच्या कामांना अपेक्षित गती प्राप्त होत आहे. पादचा-यांना पूर्व -

रेल्वे मार्गावर धुराचे लोट येताच उडाला गोंधळ, पसरले भीतीचे वातावरण; नेमका कसला होता 'तो' धूर जाणून घ्या

ठाणे : शुक्रवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी पसरलेल्या धुरामुळे नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती. मध्य रेल्वेवर

तब्बल ४६ वर्षांनंतर भांडुप संकुला २००० दलशक्ष लिटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प येत्या एप्रिल २०२९ पर्यंत होणार प्रकल्प पूर्ण

मुंबई :  भांडुप संकुल येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण