जन्मदिनी तरुणाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, पाच जणांना अटक

मुंबई : वाढदिवस साजरा करताना नवनवे उद्योग करायचे आणि त्याचे व्हिडीओ करुन व्हायरल करायचे हा प्रकार अलिकडे वाढला आहे. ताजी घटना मुंबईतील कुर्ला परिसरातील आहे. कुर्ला येथे जन्मदिनी तरुणाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि पाच जणांना अटक केली आहे. ज्या तरुणाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला तो जखमी आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अबुल रेहमान मकसूद आलम खान याचा २४ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाच मित्रांनी त्याला एकत्रितपणे आमंत्रित केले. केक कापण्याचा कार्यक्रम ठरला. रात्री जिथे वाहनं पार्क असतात अशा निवांत ठिकाणी भेटायचे ठरले. सर्व जण ठरलेल्या जागेवर पोहोचले. यानंतर केक कापण्यात आला. यानंतर शुभेच्छा देण्याऐवजी मित्रांनी वाढदिवस असलेल्या तरुणावर अंडी आणि दगडांचा मारा केला. थोड्या वेळानंतर ज्याचा वाढदिवस होता त्या तरुणावर मित्रांनी पेट्रोल ओतले.

पेट्रोलचा वास येताच अबुल रेहमान मकसूद आलम खान ओरडू लागला. त्याने मित्रांना ओरडतच जाब विचारला. पण मित्रांनी उत्तर दिले नाही. जे पाच जण जमले होते त्यापैकी तीन जणांनी लायटरच्या मदतीने अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. कपड्यांनी पेट घेताच संकटाची जाणीव झाल्यामुळे अबुल रेहमान मकसूद आलम खानने जमिनीवर लोळून आग विझवण्याचा प्रयत्न केला. जवळच असलेल्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार बघितला. नेमका तो तरुण अबुल रेहमान मकसूद आलम खान याला ओळखत होता. तो धावत घटनास्थळी आला. यानंतर अबुल रेहमान मकसूद आलम खान याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जीवंत जाळल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सीसीटीव्ही फूटेज तपासून अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जीवंत जाळणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारात गंभीर जखमी झालेला अबुल रेहमान मकसूद आलम खान याला बरा होण्यासाठी वेळ लागणार आहे.

पोलिसांनी अयाज मलिक, अश्राफ मलिक, कासिम चौधरी, हुझैफा खान आणि शरीफ शेख यांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस अबुल रेहमान मकसूद आलम खान वर झालेला हल्ला हा पूर्वनियोजीत होता की अचानक झाला होता याचा तपास करत आहेत.
Comments
Add Comment

न्यूमोनियामुळे श्वसनप्रणाली बंद झाल्याने ‘शक्ती’ वाघाचा मृत्यू

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील

इम्रान खान यांचा मृत्यू ? भेटींवर बंदी; अफवांनी पाकिस्तानमध्ये खळबळ!

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे संस्थापक इम्रान खान यांचा तुरुंगात

Gold Silver Rate Today: आज सलग तिसऱ्यांदा सोन्याचांदीत वाढ का? जाणून घ्या जागतिक विश्लेषण

मोहित सोमण:आज सलग तिसऱ्यांदा सोन्याच्या व चांदीच्या दरात वाढ झाली आहे. काल प्रति ग्रॅम दरात १९१ रूपयांनी वाढ

मुंबईत दुबार, तिबार... १०३ बार मतदार

मुंबईत ४ लाख ३३ हजार मतदारांची नावे दुबार नोंद दुबार मतदारांची एकूण संख्या ११ लाख ०१ हजार दुबार मतदारांचा

शिवडीत उबाठाची होणार मोठी पंचाईत, मनसेच ठरणार डोकेदुखी

मनसेसाठी आपल्याच नगरसेवकांना घरी बसवण्याची वेळ येणार उबाठावर मुंबई (सचिन धानजी) : दक्षिण मुंबईतील शिवडी

आताची सर्वात मोठी बातमी: सरकारकडून चीनला टक्कर देण्यासाठी कायमचाच तोडगा! भारतात 'या' योजनेसाठी ७३०० कोटींची योजना जाहीर

मोहित सोमण: युएस काय चीनलाही भारताने टक्कर देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. पृथ्वीवरील दुर्मिळ वस्तू म्हणून