Suraj Chavan : हिरवी साडी, गजरा आणि सुरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचा जलवा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सिझनचा विजेता (Bigg Boss Marathi Season 5 Winner) सूरज चव्हाण लवकरच आपल्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. सूरज चव्हाण हा लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, त्याच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झाली आहे. सूरज चव्हाणची होणारी पत्नी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता होती. अखेर, त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव संजना (Sanjana) असे आहे. येत्या २९ नोव्हेंबरला हे दोघे विवाहबद्ध होणार आहेत. सूरज चव्हाण आणि संजना यांच्या लग्नाच्या आधीचे विधी मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. सोशल मीडियावर सूरजच्या केळवणाचे (Kelvan) फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यासोबतच, नुकताच संजनाचा घाण्याचा कार्यक्रम देखील पार पडला. घाण्याच्या या कार्यक्रमात वधू संजनाने धमाल डान्स केला आहे. तिच्या या हटके डान्सचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे आणि तो वेगाने व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



नुकत्याच पार पडलेल्या घाण्याच्या कार्यक्रमात वधू संजनाचा पारंपरिक लुक चाहत्यांना खूप आवडला आहे. संजनाने या कार्यक्रमासाठी हिरव्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर तिने पारंपरिक दागिने परिधान केले होते आणि केसात सुगंधित गजरा माळला होता. या पारंपरिक वेशात तिने केलेला डान्स सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सूरज आणि संजना यांचे खास केळवण (Kelvan) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर हिने धूमधडाक्यात केले होते. अंकिताने खास संजनासाठी पुरी-भाजीचा बेत केला होता. या केळवणादरम्यान सूरजने घेतलेला उखाणाही चाहत्यांमध्ये खूप व्हायरल झाला आहे. त्याने, "बिग बॉस जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न.. संजनाचं नाव घेतो आता करेन लग्न" असा हटके उखाणा घेतला, ज्यामुळे उपस्थित पाहुण्यांमध्ये हास्याचे वातावरण निर्माण झाले. आता २९ नोव्हेंबरला होणाऱ्या या दोघांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे.





'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याच्यासाठी हे पर्व केवळ विजेतेपदच नव्हे, तर अनेक स्वप्नपूर्तीचे द्वार उघडणारे ठरले आहे. 'बिग बॉस'नंतर सूरजची सर्व स्वप्नं हळूहळू पूर्ण होताना दिसत आहेत. सर्वात आधी, त्याने 'झापुक झुपूक' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आणि प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'बिग बॉस मराठी'चा विजेता झाल्यानंतर सूरजने व्यक्त केलेली एक प्रमुख इच्छा होती, ती म्हणजे गावात 'हक्काचे घर' बांधण्याची. त्याने या घराच्या बांधकामाला लगेच सुरुवात केली. घराच्या बांधकामाचे व्हिडिओ वेळोवेळी चाहत्यांसोबत शेअर करत, त्याने आपल्या प्रवासात त्यांनाही सहभागी करून घेतले. आता घराचे बांधकाम पूर्ण झाले असून, सूरज चव्हाणने गृहप्रवेशाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील कमेंट करत सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत. सूरज चव्हाणच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या आणि नव्या टप्प्याबद्दल चाहते त्याचे अभिनंदन करत असून, शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.