ठाणे : डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पलावा सिटीसमोरील खाडीमध्ये तीन दिवसांपूर्वी एका मोठ्या सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांमध्ये तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. तरुणीचा प्रियकर श्रीनिवास विश्वकर्माने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले.
मृत तरुणी सुरुवातीला रेल्वे प्लेटफॅार्मवर भिक मागायची. मात्र ५ वर्षांपूर्वी श्रीनिवास विश्वकर्मा तिला आपल्या घरी राहण्यासाठी घेवून आला होता. कधी बहीण, कधी मुलगी तर कधी बायको म्हणून श्रीनिवास तिची ओळख लोकांना सांगायचा. पण तो तिच्यावर सारखे लैंगिक अत्याचार करायचा. हत्या झाली तेव्हा तरुणी ४ महिन्यांची गर्भवती होती. तरीही आरोपी तिच्यावर जबरदस्ती करत होता. यावेळी तरुणीने नकार दिल्यामुळे आरोपीने गळा आवळून हत्या केली.
अमरावती : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील निवडणूकांसाठी प्रचार सुरू आहे. यासाठी सर्व ...
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पलावा सिटीसमोरील खाडी परिसरातील सगळे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. यामध्ये एक व्यक्ती खाडीच्या दिशेने सुटकेस घेऊन जात असल्याचे आढळले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिळडायघर पोलिसांनी २४ तासात प्रकरण उघडकीस आणले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ आणि पीआय राजपूत यांच्या टीमने २४ तासांत आरोपी श्रीनिवास विश्वकर्मा याला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून अटक केली आहे.