वंदना गुप्ते यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर

मुंबई : मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जाहीर झाला आहे. जागतिक रंगकर्मी दिवसाचे औचित्य साधून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या रंगकर्मींचा हक्काचा एक दिवस असावा आणि त्या निमित्ताने रंगकर्मींच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दरवर्षी 'जागतिक रंगकर्मी दिवस' साजरा करण्यात येतो. मराठी रंगभूमीसाठी सर्वस्व वाहिलेल्या नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर हा दिवस, २०१४ या वर्षापासून कलाकार संघातर्फे 'जागतिक रंगकर्मी दिवस' म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' सन्माननीय रंगकर्मीला प्रदान केला जातो. यंदा हा पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर करण्यात आला आहे.

दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा कलावंत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने आयोजित केला जातो. मात्र यंदा महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांवर ओढवलेल्या पूर परिस्थितीच्या संकटामुळे, हा सोहळा जाहीररित्या न करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे हा पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या दालनात लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सदर सोहळ्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याची माहिती मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी दिली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही मराठी नाट्य कलाकारांची मातृसंस्था असून, मराठी नाट्य कलाकार संघ ही नाट्य परिषदेची व्यावसायिक रंगभूमीवरील रंगकर्मींसाठी कार्य करणारी अधिकृत घटक संस्था आहे. या संस्थेच्या वतीने व्यावसायिक रंगकर्मींसाठी अनेक हिताचे उपक्रम राबविण्यात येतात. आतापर्यंतच्या 'जागतिक रंगकर्मी दिवस' सोहळ्यांमध्ये भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, किशोर प्रधान, शोभा प्रधान, गंगाराम गवाणकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, उषा नाडकर्णी, रोहिणी हट्टंगडी व मोहन जोशी या कलाकारांना मराठी नाट्य कलाकार संघातर्फे 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

अलविदा ही मॅन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. वयाशी संबंधित आजारांमुळे काही दिवसांपासून ते

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी