Gold Silver Rate Today: सलग दुसऱ्यांदा सोन्याचांदीच्या दरात तुफान वाढ 'या' जागतिक कारणांमुळे! वाचा सविस्तर

मोहित सोमण: युएस फेडरल रिझर्व्ह बँकेकडून डिसेंबरमध्ये मिळालेले संकेत, आगामी किरकोळ विक्री (Retail Sales) आकडेवारी, आगामी ग्राहक किंमत निर्देशांकातील आकडेवारी, तसेच वाढलेल्या स्पॉट बेटिंगमुळे वाढलेली मागणी तसेच वाढलेली आयात ड्युटी, घसरलेला डॉलर अशा एकत्रित कारणांमुळे आज सोन्याचा दर सलग दुसऱ्यांदा तुफान वाढला आहे. गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात आज संध्याकाळपर्यंत १९१ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १७५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १४३ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२७०४ रूपये २२ कॅरेटसाठी ११६४५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९५२८ रूपयांवर पोहोचला आहे. प्रति तोळा किंमत पाहता, २४ कॅरेट प्रति तोळा दरात १९१० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १७५० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १४३० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२७०४० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी ११६४५० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी ९५२८० रूपयांवर पोहोचले आहेत. यासह संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचा प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १२७०४ रूपये ,२२ कॅरेटसाठी ११७२० रूपये १८ कॅरेटसाठी ९५२८ रूपयांवर पोहोचले आहेत.


तसेच कमोडिटी बाजार एमसीएक्समध्येही (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.९८% वाढ झाली आहे तर दरपातळी १२५०६६ रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०८% घसरण झाली असून सोन्याच्या गोल्ड स्पॉट दरात ०.०५% घसरण झाली आहे. सोन्यासारख्या नॉन-परफंडिंग मालमत्तेसाठी कमी व्याजदरांची शक्यता चांगली आहे, कारण त्यामुळे कर्जात गुंतवणूक करण्याचे आकर्षण कमी होते. फेडने गेल्या दोन बैठकांमध्ये दर कमी केल्याने या पिवळ्या धातूने या वर्षी विक्रमी उच्चांक गाठला.


याशिवाय चीन आणि जपानमधील वाढत्या तणावामुळे आज सोन्याची मागणीही वाढली आहे तर विकसित देशात वाढलेल्या राजकोषीय खर्चाबद्दल चिंता गुंतवणूकदार व विश्लेषकांना कायम राहिली आहे. अमेरिकेतील महत्त्वाच्या आर्थिक निर्देशांकांच्या आगमनापूर्वीच्या सावधगिरीमुळेही आणखी सोन्याची मागणी वाढली या कारणामुळे आज कमोडिटी बाजारात मोठी रॅली झाली आहे. सोन्यात वाढ होत असताना रूपयांच्या तुलनेत डॉलर घसरल्यानेही भारतीय सराफा बाजारात अपवर्ड मुमेंट स्पष्ट केली आहे. मात्र दुपारनंतर डॉलर स्थिर झाल्यानंतर सोन्याने आणखी आगेकूच केली आहे.


आजच्या सोन्याच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सोन्याचा भाव सकारात्मक झाला आणि तो ११०० रुपयांनी वाढून १२५००० रुपयांवर पोहोचला होता. कॉमेक्स सोन्याच्या किमतीत ४१३० डॉलर्सची वाढ आणि रुपया स्थिर राहिल्याने त्याला पाठिंबा मिळाला. अमेरिकन सरकारच्या पुनरुज्जीवनामुळे डेटा-हेवी आठवड्याची सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये रिटेल सेल्स, कोअर पीसीई किंमत निर्देशांक, पीएमआय आकडे आणि जीडीपी डेटा यासारख्या प्रमुख घोषणांचा समावेश आहे. हे सर्व जवळच्या काळात सोन्याच्या भावाला आकार देतील. किमती १२३५०० ते १२६५०० रुपयांच्या श्रेणीत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'


चांदीतही वाढ कायम !


गेल्या दोन दिवसात चांदीच्या प्रति किलो दरात एकत्रितपणे ७००० रूपयांनी वाढ नोंदवली गेली आहे. युएस फेड व्याजदरात कपातीची आशा व्यक्त केली जात असताना सोन्यासह चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच वाढलेल्या स्पॉट मागणीसह मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादनातील चांदीची मागणी, व युएस बाजारातील महत्वाची आर्थिक आकडेवारी जाहीर होणार असल्याने चांदीतही वाढ झाली आहे.'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ४ रुपयाने वाढ झाली असून प्रति किलो दरात ४००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे प्रति ग्रॅम दर १६७ रूपये, प्रति किलो दर १६७००० रुपयांवर पोहोचले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २४ १७४० रूपये, तर प्रति किलो दर १७४००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.२५% वाढ झाल्याने दरपातळी १५६४१० रूपयांवर पोहोचले आहेत. तसेच संध्याकाळपर्यंत चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात ०.२३% घसरण झाली आहे.फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या नकारात्मक टिप्पण्यांनंतर डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या दर कपातीच्या वाढत्या अपेक्षांमुळे चांदीचे वायदा किंचित वाढून ०.२१% वाढून १५४४८२ वर बंद झाला. तथापि, मिश्रित आर्थिक संकेतांनी बाजारातील भावनांवर प्रभाव पाडला होता.

Comments
Add Comment

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अग्निशमन प्रणाली झाली जुनी; धुर शोध प्रणालीही नाही अस्तित्वात

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर

विक्रोळीतील निवडणूक गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे बंद

आता नव्याने सी सी टिव्ही कॅमेरांसह फायर अलार्म प्रणाली बसवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): निवडणूक खात्याच्या

मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आता हेल्थ चॅटबॉट; भविष्यात रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही करणार सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या

घरगुती गुंतवणूकदारांची सत्वपरीक्षा ! शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टीत घसरण 'या,' जागतिक कारणांमुळे

मोहित सोमण : आजही इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात अपेक्षित घसरण कायम राहिली असून सेन्सेक्स

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.