चेंबूरमध्ये देवीच्या मूर्तीला ‘मदर मेरी’चे वस्त्र; धार्मिक भावनांना धक्का, पुजारी दोन दिवस पोलिस कोठडीत

मुंबई : मुंबईच्या चेंबूर परिसरात एका मंदिरात घडलेल्या विचित्र घटनेने मोठा धार्मिक वाद निर्माण केला आहे. वाशी नाका भागातील काली मातेच्या मूर्तीला ‘मदर मेरी’ प्रमाणे पोशाख घालण्यात आल्यानंतर हिंदू संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मूर्तीवरील पोशाख बदलाचा हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी मंदिरातील पुजारीला तातडीने ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील पुजारी रमेश याने स्वतःच काली मातेच्या मूर्तीला मदर मेरीसारखा पोशाख परिधान केला होता. मूर्तीचे संपूर्ण रूपच वेगळ्या धार्मिक प्रतिकासारखे दिसत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. चौकशीत पुजाऱ्याने दावा केला की, “देवीने स्वप्नात येऊन मदर मेरीचा पोशाख घालण्यास सांगितले.” मात्र हिंदू संघटनांनी हा दावा तात्काळ फेटाळून लावत, हा जाणीवपूर्वक केला गेलेला अवमान असल्याचे सांगितले.


वाद वाढताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुजारी रमेशला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात या कृतीमागे काही मिशनरी लोकांनी प्रलोभन अथवा आर्थिक मदत दिल्याचा आरोपही समोर आला असून, त्या दिशेनेही चौकशी सुरू आहे.


घटनेनंतर बजरंग दलासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला. संघटनांनी मंदिर परिसरात आंदोलन करून, प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे चेंबूर परिसरात धार्मिक वातावरण तापले असून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

शरद पवार गटाच्या सूर्यकांत मोरेंकडून विधिमंडळ सभागृहाचा अवमान

मुंबई : शरद पवार गटाचे सूर्यकांत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे झालेल्या सभेत

बॉलिवूड ड्रग प्रकरण ; सिद्धांत कपूरची ANC कडून चौकशी

मुंबई : बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा ड्रग्ज सिंडिकेटचे सावट गडद होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात पालवे कुटुंबियांचे गंभीर आरोप; पोस्टमॉर्टेम व तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणात खुलासे

टी-२० विश्वचषक २०२६चे वेळापत्रक जाहीर, १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान सामना

दुबई : आयसीसीने २०२६ च्या पुरुष टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून, भारताचा पहिला सामना ७

नवनीत राणांनी व्यक्त केली खासदार होण्याची इच्छा, मुख्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर

अमरावती : अमरावतीच्या धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि धारणीमधील भाजपच्या सर्व