शरद पवार गटाच्या सूर्यकांत मोरेंकडून विधिमंडळ सभागृहाचा अवमान

मुंबई : शरद पवार गटाचे सूर्यकांत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे झालेल्या सभेत विधानपरिषदेचे सर्व सदस्य, सभापती व राज्याचे सर्वोच्च मानले जाणारे विधानसभा सभागृह याबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानजनक विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओही समाजमाध्यमात व्हायरल झाला होता. मोरे यांनी केलेल्या विधानाबद्दल भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर आणि आ. श्रीकांत भारतीय यांनी विशेषाधिकार भंग नोटीस दाखल केली आहे.

सूर्यकांत मोरे यांनी जाहीर सभेत बोलताना तांबड्या रंगाच्या बिल्ल्याला कुणी विचारत नाही व हिरव्या रंगाच्या पिलावळीला मंत्रालयात सचिव लगेच बसा म्हणतात.उडालेले बल आपण ज्याला म्हणतो असे सगळे पुढे बसलेले असतात. कुणी पिक्चर मधून आलेला, कुणी नाटकातून, कुणी क्रिकेटमधून आलेला तर कुणी म्हाताऱ्या माणसातून निवडून गेलेला असे सर्व उडालेले बल तिथे आहेत. तसेच सभापतींबाबत बोलताना त्यांनी म्हटले कि, सभापतींचे काम हे सभागृहातील मत मोजणी करण्याएवढेच आहे. पंचायत समितीच्या सभापतीला जे अधिकार आहेत ते अधिकार देखील विधानपरिषदेच्या सभापतींना नाही. सभापतींसमोर २८८ सदस्य बसत नाहीत. केवळ ७०-७५ सदस्य बसतात. सभापती कायदे बनवीत नाहीत. अधिवेशनाचे कामकाज वर्षभरातून केवळ तिसच दिवस होते. विधानपरिषद सभागृहाचे कार्पेट व एकूणच सभागृहाची रचना ही लाल रंगात असून विधानसभेची हिरव्या रंगात आहे. विधानपरिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचे प्रतिक असल्याचे विधानही त्यांनी केले होते.
Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

रोहित शर्मा टी-२० विश्वचषकाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

दुबई : भारताच्या माजी कर्णधार आणि दोन वेळा टी-२० विश्वचषक विजेता रोहित शर्मा याची आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी

अलिबाग-मुरुड बस सेवा ठप्प ; प्रवाशांचा खोळंबा

नांदगाव मुरुड ( वार्ताहर): अलिबाग आगारातून मुरुडकडे जाणाऱ्या एसटी बस सेवेत मंगळवारी गंभीर गफलत पाहायला मिळाली.

वंदना गुप्ते यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर

मुंबई : मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना

लोणावळा स्टेशनवर RPF जवानांचे धाडस; प्रवासी थोडक्यात बचावला

पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची धावपळ सुरू असते. चालू गाडी पकडण्याची घाई अनेकदा जीवघेणे प्रसंग

वसईत विषारी वायूची गळती ; १३ जण बाधित

वसई : पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वायूच्या सिलेंडरमधून विषारी वायूची गळती झाली. या वायू गळतीमुळे परिसरातील