लोणावळा स्टेशनवर RPF जवानांचे धाडस; प्रवासी थोडक्यात बचावला

पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची धावपळ सुरू असते. चालू गाडी पकडण्याची घाई अनेकदा जीवघेणे प्रसंग ओढवून आणते. विशेषतः गर्दीच्या वेळेत पाय घसरून पडण्याच्या आणि प्लॅटफॉर्म–गाडीच्या फटीत अडकण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. अशाच एका धोकादायक प्रसंगातून एका व्यक्तीला वाचवण्यात लोणावळा स्थानकातील RPF जवानांना यश आले आहे.


लोणावळा रेल्वे स्टेशनवर २३ नोव्हेंबर रोजी चेन्नई एक्स्प्रेस सुटत असताना एसी कोचमधील प्रवासी श्रुंग गुप्ता गाडीमध्ये चढण्याच्या घाईत तोल गमावून थेट प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या जागेत घसरून अडकले. काही सेकंदांचा विलंब झाला असता मोठी दुर्घटना घडली असती.


पण ड्युटीवर असलेले RPF सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र मोहन आणि निरीक्षक विपिन कुमार यांनी क्षणाचाही विचार न करता धाव घेत गुप्ता यांना बाहेर खेचून सुरक्षित स्थळी आणले. या जलद प्रतिसादामुळे त्यांचा जीव वाचला. विपिन कुमार यांच्या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


विशेष म्हणजे, गुप्ता यांचा केवळ आठ दिवसांपूर्वी विवाह झाला होता. पत्नीसमवेत पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी ते निघाले होते. परंतु घडलेल्या या प्रसंगाने त्यांना चांगलाच धक्का बसला. “गाडी पकडताना पाय घसरला आणि मी थेट खाली घुसत होतो… पण RPF म्हणजे जणू विठू माऊलीच मदतीला आली," असे म्हणत त्यांनी जवानांचे मनापासून आभार मानले.

Comments
Add Comment

पुण्यात वाढतेय बिबट्याची दहशत! औंधनंतर आता धानोरीमध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत वाढली आहे. ग्रामीण भागात दिसणाऱ्या बिबट्यांची

डॉ. गौरी पालवेच्या पार्थिवावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; अंत्यसंस्कारादरम्यान वडिलांचा आक्रोश, "तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या"

अहिल्यानगर : पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या

इंटरलॉकिंग कामासाठी मध्यरेल्वेच्या 'या' स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक! जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा - बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding.... एकाच दिवशी दोन धक्के…स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत २३

पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड

‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या