मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे यांनी याबाबत विचारणा केली असता, 'अलिबाग आगारातून मुरुडला जाणारी बस पाच वाजता सुटली आहे,' असा दावा केला. मात्र, प्रवाशांचा अनुभव आणि आगारातील परिस्थिती यानुसार बस वेळेवर निघालेली नव्हती. अलिबाग आगारात चौकशी केली असता तेथील अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मुरुडकडे जाणाऱ्या बसेस मुख्यतः मुरुड आगारातून निघालेल्या असतात, अलिबाग आगाराची बस या मार्गावर नियमित निघत नाही. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर मुरुडला पोहोचण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करावी लागते. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रवाशांना वेळेवर माहिती देणे आणि वाहतूक व्यवस्थापन मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.यामुळे अलिबाग-मुरुड मार्गावर बस सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.