अयोध्येतील राम मंदिरावर उद्या ध्वजारोहण

ऐतिहासिक क्षणाला पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती


अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी नवीन इतिहास लिहिला जाणार आहे. श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा विजय ध्वज फडकवण्यासाठी एक भव्य समारंभ आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असतील.


ध्वजात सूर्याचे प्रतीक असेल, जे भगवान रामाच्या सूर्यवंशी वंशाचे आणि दैवी उर्जेचे प्रतीक आहे. पॅराशूट उत्पादनात विशेषज्ञ असलेल्या अहमदाबाद येथील एका कंपनीने हा ध्वज डिझाइन केला आहे. ११ फूट रुंद आणि २२ फूट लांब असा या ध्वजाचा आकार आहे. हा ध्वज तीन थरांचा असून, तो रेशमी सिल्कचा आहे आणि त्याचा रंग पितांबरी आहे. हा रंग सूर्योदयापूर्वी क्षितिजावर दिसणाऱ्या लालसर रंगासारखा आहे. सूर्य, पाऊस आणि जोरदार वारा सहन करण्यासाठी हा विशेष पॅराशूट कापड आणि रेशमी धाग्यांपासून बनवला आहे. या ध्वजावर हाताने नक्षीकाम करून भगवान रामाचे राजचिन्ह असलेले कोविदार वृक्ष, सूर्यदेवाचे प्रतीक आणि त्या सूर्याच्या मध्यभागी ओंकार हे चिन्ह बनवण्यात आले आहे. हा ध्वज तयार करण्यासाठी एकूण ६ कारागिरांनी मेहनत घेतली आहे.




  1. हा समारंभ सुमारे चार तास चालेल. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि हजारो मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी मंदिर संकुलात ७ हजार हून अधिक पाहुण्यांना संबोधित करतील. भगवान महादेव, गणेश, हनुमान, सूर्यदेव, माँ भगवती, माँ अन्नपूर्णा आणि शेषावतार यांच्या उपकेंद्रांनाही विस्तृत सजावटीने सजवण्यात आले आहे.

  2. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, ध्वजारोहणाचा संपूर्ण कार्यक्रम फक्त १० मिनिटांचा असेल आणि तो माध्यान्ह काळात अभिजित मुहूर्तावर केला जाईल.

Comments
Add Comment

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा

राजस्थानच्या फतेहपूर-माउंट अबूमध्ये तापमान ४ अंश सेल्सिअस

नवी दिल्ली  : उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह ८ राज्यांमध्ये शनिवारी सकाळी कडाक्याच्या थंडीसह दाट