वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंना धक्का

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या होमपिचवरच अनपेक्षित धक्का बसला आहे. वाई नगरपालिका निवडणुकीत झालेल्या अचानक घडामोडींमुळे शिवसेनेचा उमेदवार बाद झाला असून संबंधित नेत्याचे पदही गेल्याने पक्षात खळबळ माजली आहे.


वाई नगरपालिकेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांनी त्यांच्या भावाला, प्रवीण शिंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणी विकास शिंदे यांनी भावाला उमेदवारी मागे घ्यायला सांगितल्याने परिस्थिती एकदम बदलली. हा निर्णय कोणालाही विश्वासात न घेता घेतल्याचा आरोप करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी विकास शिंदे यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे उमेदवारही बाद झाला आणि उपजिल्हाप्रमुखांचे पदही गमावले.


घडलेल्या या प्रकारानंतर विकास शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांकडून उमेदवारीबाबत कोणतीही सूचना न मिळाल्याने शेवटच्या दोन मिनिटांत एबी फॉर्म मागे घेतल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अनेक वेळा संपर्क साधूनही पक्षाकडून स्पष्ट भूमिका न आल्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले.


याचबरोबर विकास शिंदे यांनी जिल्हाप्रमुख रणजित भोसले यांच्यावर गंभीर आरोप केले. वाई तालुक्यात राहूनही इतर पक्षांशी अधिक संपर्क साधणे, टार्गेट करणे, विरोधात बातम्या छापून आणणे आणि कोणतीही नवीन शाखा उभी न करणे अशा अनेक गोष्टींसाठी त्यांनी भोसले यांना जबाबदार ठरवले. वाईतील या नाट्यमय घटनांमुळे निवडणूक रणधुमाळीत नवीन घडामोडींची भर पडली आहे आणि शिवसेनेसमोर प्रश्न उभा राहिला आहे.

Comments
Add Comment

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Nashik : ‘मिशन ग्रीन मान्सून’च्या नवव्या टप्प्यात सिन्नर औद्योगिक क्षेत्रात वृक्षारोपण

Nashik : उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर व जिल्हा हरित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

Nashik Accident News : पिकअपची दुचाकीला भीषण धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या २७