वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे १९-२० डिसेंबरला मुंबईत आयोजन

जगभरातील अग्रणी उद्योगपती, व्यावसायिक आणि विचारवंत यांना एकत्र आणणारे व्यासपीठ


मुंबई : वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूएचईएफ) २०२५ चे आयोजन मुंबईतील ग्रँड हयात, महाराष्ट्र येथे १९-२० डिसेंबर रोजी केले जाणार आहे. यंदाची थीम नवोपक्रम, स्वावलंबन आणि समृद्धी अशी आहे. या फोरममध्ये भारतासह जगभरातील अग्रणी उद्योगपती, धोरणनिर्माते, उद्योजक आणि जागतिक गुंतवणूकदार सहभागी होणार असून सर्वसमावेशक विकास, उद्योजकतेचा विस्तार आणि हिंदू सांस्कृतिक मूल्यांवर आधारित संपत्ती निर्मिती या विषयांवर विचारविनिमय केला जाणार आहे.


महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि ओडिशाचे मुख्यमंत्री तसेच भारतातील अनेक अग्रगण्य उद्योगपती यांना देखील निमंत्रणे देण्यात आली आहेत.डब्ल्यूएचईएफचे प्रवर्तक स्वामी विज्ञानानंद म्हणाले, “आपली अर्थव्यवस्था हीच आपली ताकद आहे. डब्ल्यूएचईएफच्या माध्यमातून जागतिक हिंदू समाजातील प्रतिभा, ज्ञान आणि उद्योजकतेची एकत्रित शक्ती वापरून अधिकाधिक संपत्ती निर्माण करणे आणि ती सर्वांसोबत वाटणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ”


दोन दिवसीय फोरमचा पहिला दिवस (१९ डिसेंबर) मोठ्या कॉर्पोरेट्ससाठी विशेष सत्राने सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी (२० डिसेंबर) एमएसएमई आणि उद्योजकीय सत्र आयोजित केले जाईल. या सत्रात विविध क्षेत्रांतील ४०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.


प्रत्येक फोरम डब्ल्यूएचईएफच्या मूलभूत तत्त्वाची पुन्हा पुष्टी करतो “धर्मस्य मूलं अर्थः” आर्थिक सामर्थ्य हीच खरी शक्ती, आणि नैतिक, समाजकेंद्रित आर्थिक विकासातूनच शाश्वत समृद्धी मिळते वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम हे जगभरातील यशस्वी उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योगपती, व्यावसायिक आणि विचारवंत यांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. नवोपक्रम, सहकार्य आणि धर्माधिष्ठित मूल्यांच्या आधारे उद्योजकता प्रोत्साहन, संपत्ती निर्मिती आणि समाजसमृद्धी हे डब्ल्यूएचईएफचे ध्येय आहे.


Comments
Add Comment

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील

अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने