स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेनेची मोठी तयारी; मराठवाड्यात अनुभवी नेत्यांना प्रमुख भूमिका

मुंबई : मराठवाड्यातील शिवसेना (शिंदे गट) संघटनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेऊन मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनुभवी आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांना जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या बदलांमधून पक्षाने निवडणुकीकडे गांभीर्याने पाहत संघटना मजबुतीकडे स्पष्ट वाटचाल सुरू केल्याचे दिसते.


मुंबईत पक्षाने केलेल्या या नव्या घोषणेनुसार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत महत्त्वाची जबाबदारी अनुभवी नेत्यांना सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नियुक्त संपर्कप्रमुखांना निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संबंधित जिल्ह्यात राहून पक्षाची मोहीम मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत.


शिवसेना सचिव संजय मोरे यांनी राज्यातील एकूण 40 जिल्हा संपर्कप्रमुखांची यादी शनिवारी जाहीर केली. नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये संघटना बळकट करण्यासाठी आमदार आणि खासदार यांचा थेट सहभाग असणार आहे.


नवीन नियुक्त्या पुढीलप्रमाणे:


छत्रपती संभाजीनगर महानगर – विलास पारकर
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण – अर्जुन खोतकर, भास्कर आंबेकर
बीड – टी. पी. मुंडे, मनोज शिंदे
धाराशिव – राजन साळवी
नांदेड – सिद्धराम मेहत्रे
लातूर – किशोर दराडे
परभणी – आनंद जाधव
हिंगोली – हेमंत पाटील


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यात अनेक बदल होताना दिसत आहेत. पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद निर्माण झाला. फक्त वादच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट अमित शाह यांच्या भेटीला या मुद्द्यावरून पोहोचले. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री देखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते. यावेळी त्यांनी कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी दाखवत आपली नाराजी व्यक्त केली.

Comments
Add Comment

मुंबईत भाजप विरोधात मविआ मनसेला सोबत घेऊन लढणार ?

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जवळ आल्याने सर्व राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. अनेक

भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेची राजस्थानमध्ये नवी खेळी

जयपूर : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. यानंतर राज्यात

'स्थानिक'च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जाहीर

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि

नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांनी केली अटक

नंदुरबार : नवापूर नगरपालिकेतच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने नगराध्यक्षांसह पूर्ण

मुंबईत राडा, काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे मुंबईत राडा झाला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम

रायगडमध्ये भाजप - राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी रंगणार लढत, थंडीत रंगणार मित्रपक्षांचा सामना

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांमधील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. बहुतांश नगरपालिकेत